Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 23:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यांतली एकही व्यर्थ गेली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वांतली एकही गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हाला प्राप्त झाल्या; त्यातली एकही गोष्ट कमी पडली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “आता मी लवकरच सर्व जग जाते त्या वाटेने जाणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व हृदयाने व जिवाने माहीत आहे की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या अभिवचनातील एकही निष्फळ झाले नाही. प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले आहे; एकही निष्फळ झाले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 23:14
16 Iomraidhean Croise  

इस्राएलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वाहा;


“मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार; तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव.


“ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्राएल लोकांना विसावा दिला तो धन्य! तो आपला सेवक मोशे ह्याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही.


मला ठाऊक आहे की तू मला मृत्युवश करशील; सर्व जीवधारी ज्या स्थळी एकत्र होणार आहेत त्याप्रत मला पोचवशील.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


ते चढावाला भितील; रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यांना वाटेल; बदाम फुलेल; टोळसुद्धा जड असा वाटेल; वासना निमेल; कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे, आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्यागल्ल्यांतून फिरतील.


जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील; परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत.


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


शमुवेल वाढत गेला; परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan