Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 23:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तर हे पक्के समजा की, ह्यापुढे तुमचा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांना तुमच्या दृष्टीपुढून घालवून देणार नाही, पण ती तुम्हांला पाश व सापळा, तुमच्या कुशीला चाबूक व डोळ्यांना काटे अशी होतील; आणि अखेरीस जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तर तुम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही; आणि जी ही उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली, तिच्यावरून तुम्ही नाश पावून जाल तोपर्यंत ती तुम्हाला सापळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तर खचित हे जाणून घ्या की, याहवेह तुमचे परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या समोरून आणखी घालवून देणार नाही. परंतु हा चांगला देश, जो याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिला आहे, त्यातून तुमचा नाश होईपर्यंत, ती राष्ट्रे तुमच्यासाठी पाश व सापळा अशी होतील, तुमच्या पाठीवर चाबूक आणि तुमच्या डोळ्यात काटे असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 23:13
24 Iomraidhean Croise  

शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले; त्याचा बाप दावीद ह्याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.


त्यामुळे परमेश्वर इस्राएलावर अति कोपायमान झाला; त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; यहूदाच्या वंशाखेरीज कोणी उरला नाही.


म्हणून परमेश्वराने इस्राएलाच्या सर्व वंशजांचा त्याग करून त्यांना पिडले, त्यांना लुटणार्‍यांच्या हाती दिले व शेवटी त्यांना आपल्या दृष्टीसमोरून घालवून दिले.


बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


तेव्हा लहानथोर सर्व लोक आणि सेनांचे नायक मिसर देशाला निघून गेले; त्यांना खास्द्यांचा धाक पडला होता.


त्यांच्यापुढे मांडलेले ताट त्यांना पाश असे होवो, ते निश्‍चिंत असता त्यांना ते जाळे असे होवो.


फारोचे सेवक त्याला म्हणाले, “हा मनुष्य कोठपर्यंत आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या. मिसर देशाचा नाश झाल्याचे आपल्याला अजून कळत नाही का?”


ते तुझ्या देशात राहता कामा नयेत; राहिले तर ते तुला माझ्याविरुद्ध पाप करायला लावतील; कारण तू त्यांच्या देवांची सेवा करशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील.”


तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.


त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरता बायका करून घेशील, आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील.


त्यानंतर इस्राएल घराण्याच्या आसपासच्या द्वेष्ट्यांपैकी कोणी त्यांना बोचणारा कांटा व टोचणारी नांगी असे उरणार नाही; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील, आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हांला त्रास देतील.


ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’


परमेश्वराने रागाने, क्रोधाने व महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसर्‍या देशात त्यांना फेकून दिले, हे आज आपण पाहतच आहोत.’


तर तुझा खात्रीने नाश होईल आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहेस तेथे तू फार दिवस राहणार नाहीस, हे मी आज तुला बजावून सांगतो.


तर आज आकाश व पृथ्वी ह्यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.


जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा संहार कर; त्यांची कीव करू नकोस; त्यांच्या देवांची सेवा करू नकोस, तसे करणे तुला पाशवत होईल.


आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर येतील.


म्हणून यहोशवाच्या मृत्युसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मीदेखील येथून पुढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan