Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 23:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यापासून परावृत्त व्हाल, तुमच्यात वस्ती करून असलेल्या उरलेल्या राष्ट्रांना धरून राहाल व त्यांच्याशी सोयरीक करून दळणवळण ठेवाल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे वळाल, आणि जी तुमच्याजवळ उरलेली राष्ट्रे यांच्याशी चिकटून रहाल आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यामध्ये जाल, आणि ते तुमच्यामध्ये येतील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “परंतु जर तुम्ही मागे फिराल आणि या राष्ट्रांतील उर्वरित जे लोक तुमच्यामध्ये राहतात त्यांच्याबरोबर स्वतःला जोडाल, त्यांच्याबरोबर सोयरीक कराल आणि त्यांची संगत धराल

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 23:12
28 Iomraidhean Croise  

ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.


याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले; त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले.


ह्या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले होते की, “तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवांकडे वळवतील.”


शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले; त्याचा बाप दावीद ह्याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.


जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो.


त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत.


किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


तरीपण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला व दुष्टाच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप ह्यामुळे तो मरेल.


जे परमेश्वरापासून पराङ्मुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करीन.”


नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात; मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते; तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.


ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत.


प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;


कारण तुझ्यामध्ये असणारा तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तुझा देव परमेश्वर ह्याचा क्रोध तुझ्यावर भडकून त्याने तुझा संहार करून तुला पृथ्वीवरून नष्ट करावे असे न होवो.


त्यांच्याशी सोयरीक करू नकोस; आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नकोस व त्यांच्या मुली आपल्या मुलांना करू नकोस;


कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवतील; आणि अन्य देवांची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील.


म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या;


मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे.


त्याचे आईबाप त्याला म्हणाले, “तू त्या बेसुनत पलिष्ट्यांतली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदांत किंवा आपल्या सार्‍या लोकांत कोणी मुली नाहीत काय?” शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मला मिळवून द्या; कारण माझे तिच्यावर मन बसले आहे.”


ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्राएल लोकांना सोडवतो


Lean sinn:

Sanasan


Sanasan