Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 23:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तुमच्यातला एक मनुष्य हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हाला सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तुमच्यातील एकजण हजारांना पळवून लावतो, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे, याहवेह तुमच्यासाठी लढतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 23:10
27 Iomraidhean Croise  

दाविदाच्या पदरी असलेल्या शूर वीरांची नावे ही : तखमोनचा योशेब-बश्शेबेथ, हा सरदारांचा नायक होता; हाच असनी आदीनो; ह्याने भाला चालवून एका प्रसंगी आठशे माणसे मारली.


त्यांच्याशी लढण्यास त्यांना कुमक मिळून त्यांनी हगरी व त्यांच्याबरोबरचे इतर लोक ह्यांना पादाक्रांत केले, कारण युद्धसमयी त्यांनी देवाचा धावा केला; त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांची प्रार्थना ऐकली.


बहुत लोकांचा संहार झाला, कारण युद्ध देवाच्या पक्षाचे होते. त्यांचा स्वतःचा पाडाव होईपर्यंत ते त्यांच्या ठिकाणी वस्ती करून राहिले.


हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.”


एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील, पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल; डोंगरमाथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभा-सारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल.


तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील.


तुमच्यातले पाच जण शंभरांना, शंभर जण दहा हजारांना पळवून लावतील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तलवारीने पडतील.


त्या दिवशी परमेश्वर यरुशलेमनिवाशांचे रक्षण करील; त्या दिवशी त्यांच्यातला निर्बल दाविदासमान होईल; व दाविदाचे घराणे देवासमान म्हणजे अर्थात त्यांच्या अग्रगामी परमेश्वराच्या दिव्यदूतासमान होईल.


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


त्याने त्यांना म्हणावे, ‘इस्राएल लोकहो, ऐका; युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात; तुमचे मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका, आणि त्यांना पाहून घाबरू नका;


कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील असे परमेश्वर करील; ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्यापुढून सात वाटांनी पळून जातील.


त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


मग तो म्हणाला, ‘मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन; कारण ही पिढी अतिशय कुटिल आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत.


त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!


हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलातर्फे लढला.


म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या;


तुमच्यासाठी तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या सर्व राष्ट्रांचे काय केले हे तुम्ही पाहिले आहे, कारण तुमचा देव परमेश्वर स्वत: तुमच्यासाठी लढला.


मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले; ते हातात घेऊन एक हजार लोकांना त्याने ठार केले.


एहूदनंतर अनाथाचा मुलगा शमगार हा पुढे आला; त्याने सहाशे पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची सुटका केली.


तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan