Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा, म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जिवेभावे त्याची सेवा करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा आणि जे शास्त्र दिले आहे; त्याचे काटेकोरपणे पालन करण्याविषयी जपा. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी, सर्व मार्गांत त्याचे अनुसरण करावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याच्याशी बिलगून रहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार जपा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:5
50 Iomraidhean Croise  

जे त्याच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीती आचरतात, ते धन्य!


त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात;


“तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.


आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.


मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये.


तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावीस म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल; मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन.


सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.


जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.


ते जर माझ्या लोकांच्या चालीरीती मन लावून शिकतील म्हणजे त्यांनी माझ्या लोकांना ज्याप्रमाणे बआलमूर्तीची शपथ घेण्यास शिकवले त्याप्रमाणे ‘परमेश्वराच्या जीविताची,’ ‘माझ्या नामाची शपथ’ वाहण्यास शिकतील तर ते माझ्या लोकांमध्ये वसतील.


येशू त्याला म्हणाला, “‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.’


तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’


कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.


ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून


जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.


माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.


तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.’


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


तुमची आठवण मी निरंतर करत असतो. म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो की, कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा;


प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;


परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.


आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावीस आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात.


मी ज्या आज्ञा आज तुम्हांला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने त्याची सेवा करीत राहाल,


ही जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याच्या सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल,


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्यात, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे.


पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल.


पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात.


तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत; कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल; त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की, ‘हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’


मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी;


आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.


तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा, निर्बंध व विधी जपून पाळा.


देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या.


जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.


माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?


तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर ह्याला धरून राहिला आहात तसेच राहा.


‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’


शमुवेल लोकांना म्हणाला, “भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा;


मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जिवेभावे त्याची सेवा करा; त्याने तुमच्यासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत ह्याचा विचार करा.


तेव्हा शमुवेलाने अवघ्या इस्राएल घराण्याला सांगितले, “तुम्ही मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ ह्यांना दूर करा, आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan