यहोशवा 22:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याने रऊबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, “आज आमची खात्री झाली आहे की, परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही; तुम्ही आता इस्राएल लोकांना परमेश्वराच्या हातून वाचवले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास ह्याने रऊबेन वंश व गाद वंश, व मनश्शे वंश यांना सांगितले, “आज आम्हांला कळले की, परमेश्वर आमच्यामध्ये आहे; कारण की तुम्ही परमेश्वराचा काही गुन्हा केला नाही; येणेकरून तुम्ही इस्राएल लोकांस परमेश्वराच्या हातातून सोडवले आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.” Faic an caibideil |