Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 आम्ही म्हटले, पुढे जेव्हा ते लोक आम्हांला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू, परमेश्वराच्या वेदीचा हा नमुना पाहा; आमच्या पूर्वजांनी ती होमबली अथवा यज्ञबली अर्पण करण्यासाठी बांधलेली नाही, पण ती तुमच्या-आमच्यामध्ये साक्षीदाखल आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 यास्तव आम्ही म्हटले की, पुढे जेव्हा ते लोक आम्हांला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यांना असे सांगू की तुम्ही परमेश्वराच्या वेदीचा नमुना “पाहा; ही आमच्या पूर्वजांनी ती होमबली किंवा यज्ञार्पणासाठी बांधली नाही तर ही आमच्या व तुमच्यामध्ये साक्ष देण्यासाठी म्हणून आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “आणि आम्ही म्हणालो, ‘जर ते आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तर आम्ही उत्तर देऊ: आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या याहवेहच्या वेदीचा हा नमुना पाहा, होमार्पणे किंवा यज्ञांसाठी नाही, परंतु आमच्या आणि तुमच्यामध्ये ही साक्ष म्हणून असावी.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:28
9 Iomraidhean Croise  

लाबान म्हणाला, “आता ही रास तुझ्यामाझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव ‘गलेद’ ठेवले.”


तेव्हा अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याच्या भेटीसाठी आहाज राजा दिमिष्क येथे गेला; त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण ह्यांचा नमुना उरीया याजकाकडे पाठवून दिला.


पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्यांप्रमाणे ह्या सर्व वस्तू बनवण्याकडे तू लक्ष दे.


त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल.


“पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही, जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात.


तर ती तुमच्या-आमच्यामध्ये व आमच्यामागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी, ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे करून परमेश्वरासमोर उपासना करावी, म्हणजे परमेश्वराशी तुम्हांला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये.


आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण व यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याची त्याच्या निवासमंडपासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणे आमच्या हातून कदापि न घडो.”


यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “पाहा, ही शिला आपल्याविरुद्ध साक्षीदार होईल, कारण परमेश्वराने आम्हांला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत; एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल म्हणून ही तुमच्याविरुद्ध साक्षीदार होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan