Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 अहो रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने तुमच्या-आमच्यामध्ये यार्देनेची सीमा नेमून दिली आहे, तेव्हा तुम्हांला परमेश्वराशी काही कर्तव्य नाही असे म्हणून तुमची मुले आमच्या मुलांना परमेश्वराचे भय सोडून द्यायला लावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हाला परमेश्वरावर हक्क नाही. अशा प्रकारे तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराचे भय धरण्यापासून परावृत्त करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 आमच्या आणि तुमच्यामध्ये याहवेहने यार्देन नदीची सीमा ठेवली आहे. तुम्ही रऊबेनी आणि गाद लोकांनो! याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही.’ तेव्हा तुमचे वंशज आमच्या वंशजांना याहवेहचे भय बाळगण्यास थांबवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:25
13 Iomraidhean Croise  

बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही; हे इस्राएला, आपल्या डेर्‍याकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांत चालते झाले.


यराबामाने जी पातके स्वत: केली व इस्राएलांकडून करवली त्यामुळे परमेश्वर इस्राएलांचा त्याग करील.”


ह्याचे कारण हेच की, यराबामाने स्वतः पापकर्मे करून इस्राएलासही ती करायला लावली आणि त्याने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणला.


मी त्यांना उत्तर दिले की, “स्वर्गीचा देव आम्हांला यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कंबर कसून हे बांधणार; पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा स्मारक राहणार नाही.”


परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे; माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.


ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही.


खरोखरच आम्ही पुढचा विचार करून व विशिष्ट हेतूने हे कृत्य केले आहे; आम्हांला वाटले, मागेपुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणायची की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध?


म्हणून आम्ही म्हटले की, चला, आपण एक वेदी बांधू; ती होमबली अथवा यज्ञबली अर्पण करण्यासाठी नव्हे,


तर ती तुमच्या-आमच्यामध्ये व आमच्यामागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी, ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे करून परमेश्वरासमोर उपासना करावी, म्हणजे परमेश्वराशी तुम्हांला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये.


आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan