Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली असली, किंवा तिच्यावर होमार्पणे, अन्नार्पणे आणि शांत्यर्पणे वाहण्यासाठी बांधली असली, तर परमेश्वर स्वतःच आमचे पारिपत्य करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही जर ही वेदी बांधली, तिच्यावर होमार्पण, पेयार्पण आणि शांत्यर्पणाचे यज्ञ करण्यासाठी जर बांधली असेल, तर त्याबद्दल परमेश्वर स्वतःचे आमचे पारिपत्य करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 जर याहवेहपासून दूर जाण्यासाठी, आणि होमार्पण आणि अन्नार्पण किंवा शांत्यर्पण त्यावर करावे म्हणून आम्ही आमची स्वतःची वेदी बांधली असेल तर याहवेह स्वतः त्याचा हिशोब आमच्याकडून घेवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:23
10 Iomraidhean Croise  

तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका.


ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.”


‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्याला बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.


पण जर पहारेकर्‍याने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही व लोकांना सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यांपैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकर्‍याजवळ मागेन.


हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाहीस तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझ्याजवळ मागेन.


तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हांला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा : आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस.


तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारीन.


खरोखरच आम्ही पुढचा विचार करून व विशिष्ट हेतूने हे कृत्य केले आहे; आम्हांला वाटले, मागेपुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणायची की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध?


ह्यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आणभाक केली; तो म्हणाला, “असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूंच्या हातून माझे पारिपत्य करो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan