Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 “देवाधिदेव परमेश्वर, देवाधिदेव परमेश्वर ह्याला ठाऊक आहे व इस्राएलासही ठाऊक होवो की, आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करून किंवा त्याचा विश्वासघात करून असे केले असल्यास तो आज आम्हांला जिवंत न ठेवो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 जो समर्थ देव परमेश्वर! जो समर्थ देव परमेश्वर! तो जाणतो; आणि इस्राएल, तोसुद्धा जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वराविरुद्ध उल्लंघन असल्यास तू आज आम्हांला वाचवू नकोस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! त्यांना माहीत आहे! आणि हे सर्व इस्राएलच्या लोकांना माहीत व्हावे! जर हे, याहवेहविरुद्ध बंड करण्यासाठी किंवा आज्ञाभंग असे असेल तर आज आम्हाला जिवंत सोडू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:22
40 Iomraidhean Croise  

ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण, प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनानुसार त्याला फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस;


तुला तर ठाऊक आहेच, की मी दुष्ट नाही. तुझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.


परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे; त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन.


तर माझी खवाटे पाठीतून निखळून पडोत, माझे हात खांद्यांच्या सांध्यातून मोडून पडोत.


देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे.


तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.


महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले; हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.


तर देवाने हे शोधून काढले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो.


तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे; कापायच्या मेंढरांसारखे आम्हांला गणतात.


देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे.


देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो;


कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे.


जे कोरीव मूर्तींची उपासना करतात जे मूर्तींचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो,2 त्याच्या चरणी लागा.


आता मला कळून आले की, सर्व देवांहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिसर्‍यांनी इस्राएलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला.”


तथापि हे परमेश्वरा, तू मला जाणतोस, मला पाहतोस, तुझ्याविषयी माझे हृदय कसे आहे हे तू पारखतोस; वधायला न्यायच्या मेंढरांसारखे त्यांना बाहेर काढ; वधाच्या दिवसासाठी त्यांना सिद्ध कर.


“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.”


परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन.


मग तुम्ही वळाल, आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.


तिसर्‍यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?” “माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.


मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्‍या प्रभू,


मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.”


मी का बरे जपावे? मी तुमच्यावर प्रीती करत नाही म्हणून काय? देवाला ठाऊक आहे.


आपल्या प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही.


म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो; देवाला तर आम्ही प्रकट झालोच आहोत; आणि तुमच्या सदसद्विवेकबुद्धीतही प्रकट झालो आहोत अशी आशा मी धरतो.


कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान, पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही.


आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील; त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.


आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे.


तेव्हा रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्राएली पितृकुळांच्या प्रमुखांना म्हणाले,


त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.


मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’


अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन1 ह्यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.”


गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan