Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 हे काय थोडे झाले म्हणून तुम्ही आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहात? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले तर उद्या इस्राएलाच्या सर्व मंडळीवर त्याचा क्रोध भडकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 सध्याच्या ह्या दिवसात परमेश्वरास अनुसरण्याचे तुम्ही सोडून देत आहात काय? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 22:18
20 Iomraidhean Croise  

परमेश्वराचा कोप इस्राएलावर पुनरपि झाला, आणि इस्राएल व यहूदा ह्यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्याविरुद्ध दाविदाला केली.


पण तुम्ही व तुमच्या संततीने माझे अनुसरण करण्याचे सोडल्यास, मी तुम्हांला लावून दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यास आणि मला सोडून अन्य देवांची उपासना व भजनपूजन केल्यास,


त्याने इस्राएलास दाविदाच्या घराण्यापासून निराळे केले; तेव्हा लोकांनी नबाटपुत्र यराबाम ह्याला आपला राजा केले; त्या यराबामाने इस्राएलास परमेश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांच्याकडून महापातक करवले.


नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले.


मग परमेश्वराने इस्राएलात मरी पाठवली आणि त्यांच्यातले सत्तर हजार लोक पडले.


अमस्याने परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दिले तेव्हा यरुशलेमेत त्याच्याविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले.


इस्राएल लोक ज्या सर्व प्रदेशांत होते तेथून योशीयाने सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि जितके इस्राएल त्यांना मिळाले तितक्या सर्वांना त्याने त्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला लावले, त्याच्या सर्व कारकिर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला अनुसरायचे सोडले नाही.


मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल; पण त्याने जो अग्नी पेटवला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्राएल घराण्याने विलाप करावा.


तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”


तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.”


कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवतील; आणि अन्य देवांची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील.


ते गिलाद देशात रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे जाऊन म्हणाले,


“परमेश्वराची सर्व मंडळी म्हणत आहे, ‘तुम्ही इस्राएलाच्या देवाचा हा काय विश्वासघात केला? आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून व त्याच्याविरुद्ध बंड पुकारण्यासाठी तुम्ही ही वेदी बांधली आहे.


जेरहाचा मुलगा आखान ह्याने समर्पित वस्तूंबाबत विश्वासघात केला तेव्हा इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नव्हता काय? त्याच्या अपराधामुळे त्याचा एकट्याचाच नाश झाला असे नाही.”’


इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला; यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला.


इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.


लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या, तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या; पाहा, माझ्या डेर्‍यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत, व रुपे खाली आहे.”


तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची भक्ती करीत राहाल, त्याची वाणी ऐकत राहाल, त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करणारा हा राजा व तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचे अनुसरण कराल तर बरे;


शमुवेल लोकांना म्हणाला, “भिऊ नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan