Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 इस्राएल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 याप्रमाणे याहवेहने इस्राएलाच्या पूर्वजांना जो देश देण्याची शपथ घेतली होती, तो सर्व त्यांना दिला आणि त्यांनी त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:43
26 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन.


तो तुला व तुझ्याबरोबर तुझ्या संततीला अब्राहामाला दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहामाला दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरा आहेस, तो तुझे वतन होईल.


ते येथे वसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रीत्यर्थ त्यांनी हे पवित्रस्थान बांधले आहे. ते म्हणाले आहेत की,


त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला; तू त्यांच्यादेखत देशातले कनानी रहिवासी ह्यांना पादाक्रांत केले; त्यांचे राजे व देशाचे लोक ह्यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यांना तू त्यांच्या हाती दिलेस.


आणि त्याचे अंत:करण तुझ्यासंबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केलास की मी तुझ्या वंशजांना कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशी ह्यांचा देश देईन; तू हे आपले वचन पुरे केले आहेस, कारण तू न्यायी आहेस;


तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो;


ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती.


त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत; तू त्यांना आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणलेस.


तुम्ही तो देश ताब्यात घेऊन त्यात वस्ती करा; तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे म्हणून मी तो तुम्हांला दिलेला आहे.


“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, जो कनान देश पुढील चतुःसीमांप्रमाणे तुमचे वतन व्हायचा आहे, त्या कनान देशात तुम्ही प्रवेश कराल,


जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात; तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल.


ज्या राष्ट्रांचा ताबा घेण्यास तू जात आहेस त्यांचा पाडाव तुझा देव परमेश्वर तुझ्यासमोर करील व तू ती ताब्यात घेऊन तेथे वस्ती करशील;


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की, आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा;


परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या देशाविषयी मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी शपथ वाहिली होती की, तो मी तुझ्या संतानांना देईन, तो देश हाच; तो मी तुला प्रत्यक्ष दाखवला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जायचे नाही.”


खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील.


ही सर्व नगरे त्यांच्या आसपासच्या गायरानांसह होती; सर्व नगरांची हीच परिस्थिती होती.


तुझा देव कमोश ह्याने तुला दिलेल्या वतनावरच तू हक्क गाजवू नये काय? आमचा देव परमेश्वर ह्याने ज्यांना आमच्यासाठी हाकून लावले त्यांचे वतन आमचेच राहील.


याकोब मिसरात गेला आणि तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना पाठवले व त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणून ह्या स्थळी वसवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan