Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 हेशबोन व त्याचे गायरान आणि याजेर व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 हेशबोन व त्याचे गायरान, याजेर व त्यांचे गायरान, अशी एकंदर चार नगरे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 हेशबोन व याजेर ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:39
14 Iomraidhean Croise  

हेब्रोन्यांतला यरीया हा त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचा मुख्य होता. दाविदाच्या कारकिर्दीच्या चाळिसाव्या वर्षी त्यांचा शोध केला तेव्हा त्यांतले काही शूर वीर गिलादातल्या याजेरात सापडले.


हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.


हे सिब्मेच्या द्राक्षलते, तुझ्यासाठी याजेरच्या आक्रोशाहून अधिक आक्रोश करीन; तुझ्या फांद्या समुद्रा-पलीकडे गेल्या होत्या, याजेर सरोवरापर्यंत त्या पोहचल्या होत्या; तुझ्या ग्रीष्मऋतूतील फळांवर व द्राक्षांच्या हंगामावर लुटारू पडला आहे.


रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले.


“अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन


अटारोथ-शोफान, याजेर, यागबहा,


रऊबेनाच्या वंशजांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम,


हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दीबोन, बामोथ-बाल, बेथ-बाल-मोन;


पठारावरली सर्व नगरे, हेशबोनात राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे सर्व राज्य; ह्या राजाला व त्याच्याबरोबर त्या देशात राहणारे सीहोनाचे मांडलिक म्हणजे मिद्यानाचे सरदार अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्यांना मोशेने ठार मारले.


त्यांचा मुलुख म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा प्रदेश.


मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गाद वंशाच्या वतनातले गिलादातील रामोथ व त्याचे गायरान, ह्यांखेरीज महनाईम व त्याचे गायरान,


ह्याप्रमाणे लेव्यांतील बाकीच्या कुळांना म्हणजे मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांनी दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan