Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 21:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 नफताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालीलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोथ-दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही तीन नगरे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायरान, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायरान, आणि कार्तान व त्यांचे गायरान, अशी तीन नगरे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 नफतालीच्या गोत्राकडून: गालीलातील केदेश (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), हम्मोथ-दोर व करतान ही तीन नगरे त्यांच्या कुरणासह देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 21:32
8 Iomraidhean Croise  

नफताली वंशातून गालीलातले केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.


केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा,


त्यातील तटबंदीची नगरे ही : सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;


केदेश, एद्रई व एन-हासोर;


ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली.


हेलकथ व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.


येणेप्रमाणे गेर्षोन वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर तेरा नगरे त्यांच्या गायरानांसह होती.


तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?


Lean sinn:

Sanasan


Sanasan