Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांनी रऊबेन वंशाच्या विभागापैकी पठारावरल्या रानातले बेसेर, गाद वंशाच्या विभागांपैकी गिलादातील रामोथ आणि मनश्शे वंशाच्या विभागापैकी बाशानातले गोलान ही नगरे नेमली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पूर्वेस यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे रानातल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतले बेजेर, आणि गिलादात गाद वंशातले रामोथ, आणि बाशानात मनश्शेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 यार्देनेच्या पूर्वेकडे (यरीहोच्या पलीकडे) त्यांनी रऊबेन गोत्राच्या पठारावरील रानात असलेले बेसेर, गाद गोत्राच्या प्रदेशातील गिलआदातील रामोथ; आणि मनश्शेहच्या गोत्राच्या प्रदेशातील बाशानातील गोलान ही आश्रयस्थाने म्हणून वेगळी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 20:8
12 Iomraidhean Croise  

इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलादावर चढाई करून जाऊ का नको?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जा; प्रभू ते महाराजांच्या हाती देईल.”


तो अहाबाचा पुत्र योराम ह्याच्याबरोबर रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढायला गेला; तेव्हा अरामी लोकांनी योरामाला घायाळ केले.


यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन वंशातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, यहसा व त्याचे शिवार,


आणि गाद वंशातून गिलादी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,


माळावरील सर्व नगरे, सर्व गिलाद प्रांत आणि बाशानातील ओगाच्या राज्यातील सलका व एद्रई ह्या नगरांपर्यंतचा सर्व बाशान प्रांत आम्ही काबीज केला.


ती नगरे ही : रऊबेन्यांचे रानातील माळावरचे बेसेर, गाद्यांचे गिलादातील रामोथ व मनश्शाचे बाशानातील गोलान.


ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली.


सर्व इस्राएल लोकांसाठी व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्‍या उपर्‍या लोकांसाठी ही नगरे नेमलेली होती. कोणी एखाद्यास नकळत जिवे मारले व तो अशा एखाद्या नगरात पळून गेला, तर त्याला तेथील मंडळीसमोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेणार्‍याकडून त्याची हत्या होऊ नये.


लेव्यांच्या कुळांपैकी गेर्षोनाच्या वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले बाशानातले गोलान व त्याचे गायरान, ह्यांखेरीज बैश्तरा व त्याचे गायरान अशी दोन नगरे दिली.


रऊबेन वंशाच्या वतनांतून बेसेर व त्याचे गायरान, याहस व त्याचे गायरान,


मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गाद वंशाच्या वतनातले गिलादातील रामोथ व त्याचे गायरान, ह्यांखेरीज महनाईम व त्याचे गायरान,


Lean sinn:

Sanasan


Sanasan