Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 20:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 यास्तव त्यांनी गालीलात नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातील केदेश; एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम; आणि यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) ही वेगळी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 20:7
22 Iomraidhean Croise  

सारा ही कनान देशातील किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली, आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करायला आला.


रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते.


नफताली वंशातून गालीलातले केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.


रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते.


लेव्यांना जी नगरे द्याल त्यांपैकी सहा शरणपुरे असावीत, मनुष्यवध करणार्‍यांना तेथे पळून जाऊ द्यावे; त्या सहांखेरीज आणखी बेचाळीस नगरे त्यांना द्यावीत.


त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली;


मग मोशेने यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस तीन नगरे नेमली,


केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा,


पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते. आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता. ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली.


परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहूदाच्या वंशजांबरोबर वतन दिले तेच किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन होय; हा अर्बा अनाक्यांचा मूळ पुरुष.


त्यातील तटबंदीची नगरे ही : सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;


अदामा, रामा व हासोर;


केदेश, एद्रई व एन-हासोर;


यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांनी रऊबेन वंशाच्या विभागापैकी पठारावरल्या रानातले बेसेर, गाद वंशाच्या विभागांपैकी गिलादातील रामोथ आणि मनश्शे वंशाच्या विभागापैकी बाशानातले गोलान ही नगरे नेमली.


त्यांना त्यांनी यहूदातील डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन हे नगर सभोवतालच्या गायरानांसह दिले; आर्बा हा अनाकाचा मूळ पुरुष होता;


अहरोन याजकाच्या वंशजांना, मनुष्यवध करणार्‍यांसाठी शरणपूर म्हणून नेमलेले हेब्रोन व त्याचे गायरान, ह्यांखेरीज लिब्ना व त्याचे गायरान,


मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम व त्याचे गायरान; ह्यांखेरीज गेजेर व त्याचे गायरान,


नफताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालीलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोथ-दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही तीन नगरे दिली.


नंतर यहोशवाने इस्राएलाच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्राएलाचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले; आणि ते देवासमोर हजर झाले.


यरुब्बालाचा मुलगा अबीमलेख शखेम येथे आपल्या आईच्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांना व आपल्या आजोळच्या सर्व माणसांना म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan