Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून वा नकळत कोणाला जिवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगवणार्‍यापासून स्वतःचा बचाव करता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्यास जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यामध्ये पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 यासाठी की जर एखाद्याने अकस्मात् आणि अजाणतेने एखाद्या व्यक्तीची हत्या केली, तर त्याने तिथे पळून जावे आणि रक्ताचा सूड घेणार्‍यापासून आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 20:3
8 Iomraidhean Croise  

ती म्हणाली, “महाराजांनी आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण करावे म्हणजे रक्तपाताचा सूड घेणार्‍याला आणखी नासधूस करता येणार नाही आणि माझ्या पुत्राचा नाश होणार नाही.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या पुत्राचा एक केसही भूमीवर पडणार नाही.”


“इस्राएल लोकांना असे सांग : परमेश्वराने निषिद्ध ठरवलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले,


सूड उगवणार्‍यापासून आश्रयस्थानादाखल ही नगरे तुमच्या उपयोगी पडतील, आणि खुनी मनुष्याचा मंडळीसमोर न्याय होईपर्यंत त्याला कोणी मारून टाकू नये.


रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने स्वत: त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; तो सापडेल तेथे त्याने त्याला जिवे मारावे.


तथापि कोणी वैरभावाने नव्हे पण अचानक एखाद्याला ढकलले किंवा टपून न बसता त्याच्यावर एखादे शस्त्र फेकले, किंवा ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा हातात घेऊन नकळत कोणावर फेकला,


ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.


“इस्राएल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हांला सांगितले होते की, तुमच्याकरता शरणपुरे नेमा,


असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकिकत सांगावी; मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहायला जागा द्यावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan