Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ; कारण सार्‍या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 2:3
15 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टीला सुमारे तीन महिने झाले तेव्हा कोणी यहूदाला सांगितले की, “तुझी सून तामार हिने वेश्याकर्म केले व त्या जारकर्मामुळे तिला दिवस गेले आहेत.” तेव्हा यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढून जाळून टाका.”


आम्ही त्याला म्हणालो, ‘आम्ही सरळ माणसे आहोत, आम्ही हेर नाही,


त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार आपला स्वामी हानून ह्याला म्हणाले की, “दाविदाने आपले सांत्वन करण्यासाठी लोक पाठवले आहेत ते आपल्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शवण्याकरता पाठवले आहेत असे आपल्याला वाटते काय? ह्या नगराची पाहणी व टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून दाविदाने आपले चाकर पाठवले आहेत; नाही काय?”


अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले; ते तिला म्हणाले, “अहीमास व योनाथान कोठे आहेत?” तेव्हा त्या स्त्रीने त्यांना म्हटले, “ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत.” त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेला गेले.


त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार हानूनास म्हणाले की, “दाविदाने तुझे समाधान करायला लोक पाठवले आहेत ते तुझ्या बापाविषयी आदरबुद्धी दर्शवण्यासाठी पाठवले आहेत असे तुला वाटते काय? ह्या देशाची पाहणी-टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून त्याचे चाकर तुझ्याकडे आले आहेत, नाही काय?”


असे की अरिष्टाच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात; क्रोधाच्या दिवशी असे लोक निभावतात.


“तुम्ही त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर घेऊन जा आणि जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत; नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा.


तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, “पाहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो.”


त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता.


हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपायांच्या मध्ये निजला होता, आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते.


त्याप्रमाणे त्यांनी केले म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.


मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”


त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, “माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही.


तो तिला म्हणाला, “डेर्‍याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan