Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 2:19
23 Iomraidhean Croise  

दावीद त्याला म्हणाला, “तुझा रक्तपात तुझ्याच माथी असो; परमेश्वराच्या अभिषिक्ताचा मी वध केला असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे.”


तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात, त्याच्या पलंगावर वध केला आहे; त्याचा खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हांला ह्या भूतलावरून नष्ट करावे हे कितीतरी विशेष आवश्यक आहे; नाही काय?”


त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील; त्याने तर माझा बाप दावीद ह्याला नकळत आपल्याहून अधिक नीतिमान व भल्या अशा दोन पुरुषांवर म्हणजे इस्राएलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अबनेर आणि यहूदाचा मुख्य सेनापती येथेरचा पुत्र अमासा ह्यांच्यावर तुटून पडून त्यांना तलवारीने जिवे मारले.


आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.


नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये.


कारण परमेश्वर मिसर्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणार्‍याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही.


जो आपल्या पित्याच्या बायकोशी गमन करतो तो आपल्या पित्याची काया उघडी करतो; त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे; जो आपल्या बापाला अथवा आईला शिव्याशाप देईल त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.


जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये;


परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर; मी निर्दोष आहे; आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार.”


म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे;


तेव्हा पौल शताधिपतीला व शिपायांना म्हणाला, “हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही.”


आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.


तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते ‘कराराचे रक्त’ ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांला वाटते?


मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या;


तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ; आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”


जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहवली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan