Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यावर दया करू, आणि मला अचूक खूण द्या,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 2:12
24 Iomraidhean Croise  

तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शपथेवर असे म्हणा : मी तुमच्याशी, तुमच्या पुत्रपौत्रांशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही माझ्यावर कृपा केली तशी मी तुमच्यावर व ज्या देशात मी उपरा होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन.”


मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.


तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम ह्याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली.


मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि माझ्यावर कृपा करून फारोकडे माझी गोष्ट काढून ह्या घरातून माझी सुटका कर.


नबुखद्नेस्सर राजाने त्याला देवाची शपथ वाहायला लावली होती; त्याच्याविरुद्धही त्याने बंड केले; त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.


माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गणगोताचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू?”


आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.


ते जर माझ्या लोकांच्या चालीरीती मन लावून शिकतील म्हणजे त्यांनी माझ्या लोकांना ज्याप्रमाणे बआलमूर्तीची शपथ घेण्यास शिकवले त्याप्रमाणे ‘परमेश्वराच्या जीविताची,’ ‘माझ्या नामाची शपथ’ वाहण्यास शिकतील तर ते माझ्या लोकांमध्ये वसतील.


त्याला धरून देणार्‍याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.”


निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते.


जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणार्‍या माणसापेक्षा वाईट आहे.


कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.


तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशीही शपथ घ्या.”


मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हांला उतरवलेस, तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर.


कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.


तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरायला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.”


मग यहोशवाने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला; मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशी आणभाक केली.


त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला; त्याला त्यांनी म्हटले, “नगरात शिरण्याची वाट आम्हांला दाखव म्हणजे आम्ही तुला अभय देऊ.”


दावीद त्याला म्हणाला, “त्या टोळीकडे मला नेशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “आपण मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी आपण देवाच्या नावाने आणभाक कराल तर मी आपल्याला त्या टोळीकडे नेईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan