Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर नूनाचा पुत्र यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले, त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषतः यरीहो शहर हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 2:1
23 Iomraidhean Croise  

तुमच्यापैकी एकाला त्या भावाला आणायला पाठवा; तुम्ही येथे अटकेत राहा; म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही ह्याची परीक्षा होईल; नाहीतर फारोच्या जीविताची शपथ, तुम्ही हेर ठराल.”


मग त्यांच्याविषयी जी स्वप्ने पडली होती त्यांचे योसेफाला स्मरण होऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात.”


माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे?


परमेश्वर मोशेला म्हणाला,


“मी इस्राएल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव; त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एकेक पुरुष पाठव; प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा.


इस्राएल लोक शिट्टिमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले.


मवाबाच्या मैदानात यार्देनेतीरी बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टिमापर्यंत त्यांनी तळ दिला.


सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय;


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात.


राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्‍यांबरोबर तिचा नाश झाला नाही.


तसेच राहाब वेश्या हिनेदेखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसर्‍या वाटेने लावून दिले; ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय?


तुझ्या आज्ञेविरुद्ध बंड करणार्‍या व तुझी सर्व आज्ञावचने न पाळणार्‍या प्रत्येकाला देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व हिम्मत धर.”


मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”


हेलकथ व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.


यहोशवा पहाटेस उठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला.


इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.


बेथेल हेरण्यासाठी योसेफाच्या वंशजांनी माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते.


तेव्हा लईश प्रदेश हेरायला गेलेले पाच जण आपल्या बांधवांना म्हणाले, “ह्या घरात एक एफोद, तेराफीम (कुलदेवता), एक कोरीव मूर्ती आणि एक ओतीव मूर्ती आहे हे तुम्हांला माहीत आहे काय? आता काय करायचे ह्याचा विचार करा.”


तेव्हा देश हेरायला गेलेल्या पाच लोकांनी आत शिरून त्या कोरीव व ओतीव मूर्ती, एफोद व तेराफीम (कुलदेवता) बाहेर आणल्या. त्या वेळेस पुरोहित सहाशे सशस्त्र लोकांसह वेशीच्या दरवाजात उभा राहिला होता.


तेव्हा दानवंशजांनी आपल्या कुळातल्या लोकांतून पाच शूर वीर निवडले आणि त्यांना सरा व एष्टावोल येथून देश हेरून पाहण्यास पाठवले; त्यांना ते त्या प्रांताची पाहणी करा असे म्हणाले; ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले व तेथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan