Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 19:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सीदोन येथपर्यंत जाते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ती पुढे अब्दोन, रहोब, हम्मोन आणि कानाहाकडून मोठ्या सीदोनपर्यंत जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 19:28
15 Iomraidhean Croise  

कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.


मग ते गिलाद व तहतीम होदशी ह्या प्रदेशांत गेले; पुढे दान्यान येथे गेले; तेथून वळसा घेऊन ते सीदोनास गेले.


नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी ह्यांची सर्व नगरे येथे गेले; तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेस बैर-शेबा येथवर गेले.


तो म्हणाला, “हे कलंक लागलेल्या सीदोनाच्या कुमारिके, तू इतःपर उल्लासणार नाहीस; ऊठ, कित्ती लोकांच्या देशात निघून जा; तेथेही तुला थारा मिळणार नाही.”


समुद्रतीरींच्या रहिवाशांनो, भीतीने स्तब्ध व्हा; समुद्रपर्यटन करणारे सीदोनी व्यापारी तुला समृद्ध करीत.


हे सीदोना, फजीत हो; समुद्र, समुद्रदुर्ग म्हणत आहे : “मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणांना वाढवले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत.”


“मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख फिरवून तिच्याविरुद्ध संदेश दे;


नंतर तिसर्‍या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.


येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.


नंतर तो गालीलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता.


दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोनास पोहचलो, तेव्हा यूल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.


परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ-माईमापर्यत आणि पूर्वेस मिस्पे खोर्‍यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की, त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.


हेलकथ व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.


अशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाशांना घालवून दिले नाही;


त्या नगराचा बचाव करायला कोणी नव्हता; कारण ते सीदोनापासून दूर होते आणि अराम्यांशी त्या नगरवासीयांचा काही संबंध नव्हता. ते नगर बेथ-रहोबच्या जवळ असलेल्या खोर्‍यात होते. ते नगर पुन्हा वसवून त्यात ते राहू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan