Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, “जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिला, तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा यहोशुआ इस्राएली लोकांना म्हणाला, “याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेला प्रदेश ताब्यात घेण्यास तुम्ही किती वेळ वाट पाहणार आहात?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 18:3
15 Iomraidhean Croise  

सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवतो.


आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो.


आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी असते, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.


जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.


त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील : “हे सीयोने, भिऊ नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस.


मग अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, ‘तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’


नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.”


खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील.


यहोशवा आता वृद्ध व वयातीत झाला होता; तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यायचा राहिला आहे.


परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते.


प्रत्येक वंशातील तीन पुरुष नेमा म्हणजे मी त्यांना पाठवतो; त्यांनी देशभर फिरावे आणि आपापल्या वंशाला मिळायच्या वतनभागाचे वर्णन लिहावे व माझ्याकडे यावे.


त्यांनी म्हटले, “आम्ही तो प्रदेश पाहिला असून तो फार उत्तम आहे. चला उठा; आपण त्या लोकांवर हल्ला चढवू. तुम्ही स्वस्थ का बसला आहात? तेथे जाऊन तो देश ताब्यात घेण्याबाबत काही हयगय करू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan