Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 18:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 सेला, एलेफ, यबूसी, हेच यरुशलेम, गिबाथ व किर्याथ; ही चौदा नगरे व त्यांखालील खेडी; बन्यामिनाच्या वंशजांचे त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे हे वतन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरूशलेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 सेला हाएलेफ, यबूसी शहर (म्हणजेच यरुशलेम), गिबियाह आणि किर्याथ; ही चौदा नगरे आणि त्यांची गावे. बिन्यामीन गोत्राच्या कुळानुसार हे वतन होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 18:28
22 Iomraidhean Croise  

शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे शौलाचा बाप कीश ह्याच्या थडग्यात पुरल्या; दाविदाच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सर्वकाही केले, त्यानंतर देशासाठी केलेली प्रार्थना देवाने ऐकली.


बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय,


राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे त्या देशाचे रहिवासी यबूसी ह्यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, “तुला येथे येणे साधायचे नाही; येथले आंधळेपांगळे तुला हाकून लावतील;” त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधायचे नाही.


त्या दिवशी दावीद म्हणाला, “जो कोणी यबूशांना मारील त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जिवाचा द्वेष करणार्‍या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा संहार करावा.” ह्यावर अशी म्हण पडली आहे की, ‘येथे आंधळे व लंगडे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हायचा नाही.’


हे आपापल्या पिढीत आपापल्या पितृकुळांतले प्रमुख पुरुष असून यरुशलेम येथे राहत असत.


ते घाटांतून पार गेले; गेबा येथे मुक्काम करू असे ते म्हणत आहेत; रामा थरथर कापत आहे; शौलाचा गिबा पळून जात आहे.


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


हे इस्राएला, गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळेपासून तू पाप करीत आला आहेस; तेथेच ते अद्यापि आहेत; गिबात दुष्कर्म्यांबरोबर झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत.


बन्यामिनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : बेला ह्याचे बेलाई कूळ, अशबेलाचे अशबेली कूळ; अहीरामाचे अहीरामी कूळ;


अधिक संख्येच्या वंशांना अधिक वाटा द्यावा व कमी संख्येच्या वंशांना कमी वाटा द्यावा; प्रत्येक वंशाला त्याच्या-त्याच्या संख्येप्रमाणे वतन द्यावे;


तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांप्रमाणे वाटून घ्यावा; मोठ्या वंशाला मोठा भाग द्यावा आणि लहान वंशाला लहान भाग द्यावा; एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल; आपापल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हांला वतन मिळावे;


यरुशलेमेत राहणार्‍या यबूसी लोकांना घालवून देणे यहूदाच्या वंशजांना शक्य झाले नाही म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत यहूदाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.


तेथून ती सीमा हिन्नोमपुत्राच्या खोर्‍यातून यबूसी चढणीच्या दक्षिण भागावर म्हणजे यरुशलेमेच्या चढणीवरून पश्‍चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तर टोकास असलेल्या पहाडाच्या माथ्यावर गेली आहे;


तेथून हिन्नोमपुत्राच्या खोर्‍याच्या पूर्वेस व रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेस असलेल्या पहाडांच्या उत्तर टोकापासून हिन्नोम खोर्‍यात म्हणजे यबूसी ह्यांच्या दक्षिणेकडे ती सीमा एन-रोगेल येथे उतरते;


रेकेम, इर्पैल व तरला;


दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली; यहूदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.


यरुशलेमेत राहणार्‍या यबूसी लोकांना हाकून देणे बन्यामिनाच्या वंशजांना जमेना, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.


पण तो माणूस त्या रात्री तेथे राहीना; तो उठून मार्गस्थ झाला. तो खोगीर घातलेली आपली दोन गाढवे आणि आपली उपपत्नी ह्यांच्यासह यबूसच्या म्हणजे यरुशलेमेच्या जवळ आला.


शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan