Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 18:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 संपूर्ण इस्राएली लोकांचा समुदाय शिलोह येथे एकत्र जमला आणि तिथे त्यांनी सभामंडप उभारला. देश त्यांच्या ताब्यात आला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 18:1
26 Iomraidhean Croise  

मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्‍यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे.


तेव्हा यराबाम आपल्या स्त्रीला म्हणाला, “चल, तू यराबामाची स्त्री आहेस हे कोणाला ओळखता येणार नाही अशा प्रकारे वेष पालट आणि शिलो येथे जा; जो माझ्याविषयी बोलला होता की, मी ह्या लोकांचा राजा होईन तो अहीया संदेष्टा येथे राहतो.


यराबामाच्या स्त्रीने तसे केले. ती निघून शिलोस अहीयाच्या घरी गेली. अहीयाला दिसत नव्हते; कारण वृद्धपणामुळे त्याची दृष्टी मंद झाली होती.


एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्वर जे वचन बोलला होता ते पूर्ण करावे म्हणून शलमोनाने अब्याथारास परमेश्वराच्या याजकपदावरून काढून टाकले.


त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला; तू त्यांच्यादेखत देशातले कनानी रहिवासी ह्यांना पादाक्रांत केले; त्यांचे राजे व देशाचे लोक ह्यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यांना तू त्यांच्या हाती दिलेस.


त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;


त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हटवले; त्यांची कायमची अप्रतिष्ठा केली.


तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन, आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन.”’


‘हे मंदिर शिलोप्रमाणे होईल व हे नगर उजाड व निर्जन होईल,’ असा संदेश तू परमेश्वराच्या नामाने का दिलास?” मग सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाच्या भोवती जमले.


शखेम, शिलो व शोमरोन येथून ऐंशी माणसे आली; त्यांच्या दाढ्या मुंडलेल्या, त्यांची वस्त्रे फाडलेली, त्यांच्या अंगास घाय झालेले, व परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी हाती अन्नार्पणे व ऊद असलेली अशी ती आली.


तर तो देश परमेश्वराच्या स्वाधीन झाल्यानंतर तुम्हांला परत येता येईल आणि परमेश्वराच्या व इस्राएलाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल, आणि हा देश परमेश्वरासमक्ष तुमचे वतन होईल.


जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ‘ताब्यात घेतला’, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला.


परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते.


मग ते पुरुष मार्गस्थ झाले; तेव्हा त्या देशाचे वर्णन लिहिण्यासाठी जे जाणार होते त्यांना यहोशवाने आज्ञा दिली की, “जा, देशभर फिरा. आणि त्याचे वर्णन लिहून माझ्याकडे आणा म्हणजे मी शिलो येथे परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”


एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलाच्या वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी शिलो येथे दर्शनमंडपाच्या द्वारी परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकून ही वतने वाटून दिली. ह्याप्रमाणे देश वाटून देण्याचे संपले.


ते कनान देशातील शिलो येथे येऊन म्हणाले, “आमच्या वस्तीसाठी नगरे आणि आमच्या जनावरांसाठी गायराने द्यावीत अशी आज्ञा परमेश्वराने मोशेच्या द्वारे केली होती.”


इस्राएल लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांची सर्व मंडळी त्यांच्यावर चढाई करून जाण्यासाठी शिलो येथे जमली.


तुमच्या वतनाची भूमी अपवित्र असली तर परमेश्वराचा निवासमंडप जेथे आहे त्या परमेश्वराच्या वतनाच्या देशात नदीपार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या, पण आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीखेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि आमच्याविरुद्धही बंड करू नका.


मग रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्राएल लोकांतून कनान देशातल्या शिलोहून निघाले आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काबीज केलेल्या गिलाद देशाकडे म्हणजे त्यांच्या वतनाकडे ते परत गेले.


मीखाने केलेली कोरीव मूर्ती त्यांनी आपल्यासाठी स्थापली होती व देवाचे मंदिर शिलो येथे असेपर्यंत ती तेथे होती.


पुरुषांशी संबंध न आलेल्या चारशे तरुण मुली याबेश-गिलाद येथील रहिवाशांत त्यांना आढळल्या. त्या त्यांनी कनान देशातील शिलो येथल्या छावणीत आणल्या.


मग ते म्हणाले, “शिलो नगरात दरवर्षी परमेश्वरासाठी उत्सव होत असतो; हे नगर बेथेलच्या उत्तरेस बेथेलाहून शखेमास जाणार्‍या हमरस्त्याच्या पूर्वेस आणि लबोनाच्या दक्षिणेस वसलेले आहे.”


त्याचे दूध तोडल्यावर ती त्याला घेऊन गेली; तिने तीन गोर्‍हे, एक एफाभर सपीठ, एक बुधलाभर द्राक्षारस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात मुलाला घेऊन गेली; तो त्या वेळी केवळ बालक होता.


हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan