Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 17:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, “हा डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; बेथ-शान खोर्‍यातील व त्याच्या उपनगरांत आणि इज्रेल खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांतात राहतात, त्या सर्वांना लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथ-शान व तिजकडली खेडी यांतले, आणि इज्रेल खोरे जे, त्यामध्ये आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 योसेफाच्या लोकांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरेसा नाही आणि बेथ-शान व सभोवतालच्या वस्तीत राहणारे व येज्रील खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 17:16
20 Iomraidhean Croise  

थोड्याच वेळाने मेघ व तुफान ह्यांमुळे आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. अहाब रथात बसून इज्रेलास चालला होता.


परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला.


वरील गोष्टीनंतर असे झाले की इज्रेलकर नाबोथ ह्याचा द्राक्षमळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा अहाब ह्याच्या राजवाड्याजवळ होता.


ईजबेलीविषयीही परमेश्वर असे म्हणतो, “इज्रेलाच्या तटाजवळ ईजबेलीस कुत्री खातील.


तानख, मगिद्दो आणि बेथ-शानचा अवघा प्रदेश म्हणजे सारतानाजवळील इज्रेलाखालचा बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजू-पर्यंत असलेला प्रदेश ह्यांत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता;


इज्रेलाच्या भूमीवर ईजबेलीस कुत्री खातील; तिला पुरायला कोणी असणार नाही.” मग दार उघडून त्याने पळ काढला.


ईजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील, ही ईजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही.”’


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.


इज्रेल, यकदाम व जानोह;


इस्साखार व आशेर ह्यांच्या प्रांतांत मनश्शेचे गाव होते ते हे बेथ-शान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन-दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे हे तीन परगणे.


यहोशवा त्यांना म्हणाला, “तुमची लोकसंख्या वाढली असली व एफ्राइमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हांला पुरत नसला तर परिज्जी व रेफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा.”


यहोशवाने योसेफाच्या घराण्यास म्हणजे एफ्राईम व मनश्शे ह्यांना सांगितले, “तुमची लोकसंख्या मोठी आहे व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे; तुम्हांला केवळ एकच वाटा मिळावा असे नाही,


तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हांला मिळेल. तेथले जंगल तोडा म्हणजे आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकांजवळ लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हाकून द्याल.”


त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल, कसुल्लोथ व शूनेम;


यहूदाबरोबर परमेश्वर होता; त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला; पण तळवटीत राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना हाकून देणे त्याला जमेना.


तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशे लोखंडी रथ आणि हरोशेथ-गोयीम येथून आपल्याजवळचे सर्व लोक कीशोन नदीवर जमा केले.


त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला.


नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्‍यात तळ दिला.


इकडे पलिष्ट्यांनी आपली सर्व सेना अफेकात एकत्र केली; इस्राएल लोकांनी इज्रेलात एका झर्‍याजवळ छावणी दिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan