Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 17:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 इस्साखार व आशेर ह्यांच्या प्रांतांत मनश्शेचे गाव होते ते हे बेथ-शान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन-दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे हे तीन परगणे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि इस्साखारात व आशेरात बेथ-शान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यामध्ये राहणारे, आणि एन-दोर व त्यांची खेडी यामध्ये राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 17:11
22 Iomraidhean Croise  

तेव्हा दाविदाने जाऊन शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी याबेश-गिलाद येथील लोकांकडून आणल्या. पलिष्टी लोकांनी गिलबोवाच्या डोंगरावर शौलाचा वध केला तेव्हा त्यांनी बेथ-शानच्या चव्हाट्यावर त्यांना टांगले होते, तेथून त्यांची शवे त्या लोकांनी चोरून आणली होती.


शलमोन राजाने लोक वेठीस धरून परमेश्वराचे मंदिर, आपला राजवाडा, मिल्लो, यरुशलेमेचा तट, हासोर, मगिद्दो व गेजेर ही उभारली त्याचा वृत्तान्त असा.


हे पाहून यहूदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, “त्यालाही रथातच ठार करा.” त्यांनी त्याला इब्लामाजवळील गुरघाटात मार दिला. तो तसाच मगिद्दोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला.


तसेच मनश्शेच्या अर्ध्या वंशातून आनेर व त्याचे शिवार आणि बिलाम व त्याचे शिवार ही कहाथ वंशातील अवशिष्ट वंशजांना दिली.


त्याप्रमाणेच मनश्शेच्या वंशजांच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, मगिद्दो व त्याची खेडी, दोर व त्याची खेडी. ह्यांत इस्राएलाचा पुत्र योसेफ ह्याचे वंशज राहत होते.


तथापि योशीया त्याच्याकडून आपला मोर्चा न फिरवता त्याच्याशी लढण्यास वेशांतर करून गेला; देवाचे वचन नखोच्या द्वारे प्राप्त झाले होते ते न जुमानता तो मगिद्दोच्या खोर्‍यात युद्ध करण्यास आला.


ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.


त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोर्‍यातील हदाद्रीमोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल.


तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात, तळवटीत आणि पश्‍चिमेकडील नाफोत-दोरात असलेल्या राजांना,


तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,


नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल1 येथील गोयीमाचा2 राजा,


त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राइमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली.


दक्षिणेकडील प्रदेश एफ्राइमाचा होता व उत्तरेकडला मनश्शेचा असून समुद्र त्याची सीमा होता. त्याच्या उत्तर सीमेस आशेर व पूर्वेस इस्साखार आहे.


तेव्हा योसेफाचे वंशज म्हणाले, “हा डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; बेथ-शान खोर्‍यातील व त्याच्या उपनगरांत आणि इज्रेल खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”


मनश्शेने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ह्या नगरांतील व त्यांच्या उपनगरांतील रहिवाशांना घालवून दिले नाही, कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा हट्ट धरला.


राजे येऊन लढले; त्या वेळी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहांजवळ तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट घेतली नाही.


तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एखादी भूतविद्याप्रवीण स्त्री शोधा म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्‍न विचारीन.” त्याचे चाकर त्याला म्हणाले, “पाहा, एन-दोर येथे एक भूतविद्याप्रवीण स्त्री राहत आहे.”


त्यांनी त्याची हत्यारे अष्टारोथ देवीच्या मंदिरात ठेवली व त्याचे धड बेथ-शानच्या गावकुसावर टांगले.


तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले, आणि रातोरात जाऊन त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते बेथ-शानाच्या गावकुसावरून काढून याबेश येथे आणली व दहन केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan