Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:55 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

55 मावोन, कर्मेल, जीफ व यूटा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

55 मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

55 माओन, कर्मेल, जीफ, युत्ताह,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:55
19 Iomraidhean Croise  

हेस्री कर्मेली, पारय अर्बी,


मग अहाब खाण्यापिण्यासाठी वरती गेला. इकडे एलीया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.


यरहमेलाचा भाऊ कालेब ह्याचा ज्येष्ठ पुत्र जीफाचा बाप मेशा; हेब्रोनाचा बाप मारेशा ह्याचा वंशही त्याच्यापासूनच झाला.


शम्मयाचा पुत्र मावोन; मावोन बेथसूराचा बाप.


गथ, मारेशा, सीफ,


त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.


ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.


जीफ, टेलेम व बालोथ;


हुमटा, किर्याथ-अर्बा (हेच हेब्रोन) व सियोर; अशी नऊ नगरे व त्यांखालील खेडी.


इज्रेल, यकदाम व जानोह;


अल्लामेलेख अमाद व मिशाल. त्यांची सीमा पश्‍चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;


अईन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान अशी एकंदर नऊ नगरे त्या दोन वंशांच्या वतनातून दिली.


सकाळी अगदी पहाटेस शमुवेल उठून शौलाला भेटायला गेला; तेव्हा त्याला कोणी सांगितले की, “शौल कर्मेलास आला आहे आणि तेथे स्वतःच्या स्मरणार्थ त्याने एक विजयस्तंभ उभारला व चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे.”


मग ते निघून शौलाच्या अगोदर जीफ येथे गेले; पण दावीद व त्याचे लोक रानाच्या दक्षिणेस अराबात मावोनाचे अरण्य आहे तेथील मैदानात होते.


शौल आपले लोक बरोबर घेऊन त्याच्या शोधासाठी गेला; ही बातमी दाविदाला समजली तेव्हा तो खडकाळीतून उतरून मावोनाच्या रानात जाऊन राहिला. हे शौलाला समजले तेव्हा त्याने मावोनाच्या रानात दाविदाचा पाठलाग केला.


मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे; तो माणूस मोठा मातबर असून त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकर्‍या होत्या; तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत होता.


मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लावले आहेत; आपले धनगर आमच्यामध्ये होते; आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही, आणि ते कर्मेलात असताना त्यांची काहीएक हानी झाली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan