Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 अश्दोद, त्याची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याची उपनगरे व खेडी; मिसरचा नाला व महासमुद्राच्या तीरावरली नगरे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 अश्दोद व त्याच्या सभोवतालच्या वस्त्या व गावे, गाझा, त्याच्या वस्त्या व गावे, इजिप्तच्या नाल्यापर्यंतची गावे व भूमध्य समुद्राच्या काठापर्यंत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:47
17 Iomraidhean Croise  

पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही.


गज्जा व त्याची शिवारे येथपर्यंत पहारेकर्‍यांच्या बुरुजा-पासून तटबंदीच्या नगरांपर्यंतच्या पलिष्ट्यांना त्याने मार दिला.


त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले; गथ, यन्नो व अश्दोद ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अश्दोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसवली.


तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदापर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन; मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्यापुढून हाकून देशील.


फारोने गज्जावर मारा केला त्यापूर्वी पलिष्ट्यांविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :


गज्जाचे वपन झाले आहे; त्यांच्या खोर्‍यांतले उरलेले अष्कलोन नष्ट झाले आहे; तू कोठवर आपणास जखमा करून घेशील?


कारण गज्जाचे विस्मरण पडेल, अष्कलोन रान बनेल, अश्दोदास भर दुपारी हाकून देतील, एक्रोनावर नांगर फिरेल.


इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.”


तसेच अव्वी लोक गज्जा नगरापर्यंत खेड्यापाड्यांत वस्ती करून होते; कफतोराहून आलेले कफतोरी ह्यांनी त्यांचा संहार करून त्यांच्या जागी वस्ती केली.)


इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.


(मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);


तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या नाल्यापर्यंत निघाली आहे; तिचा शेवट समुद्रानजीक झाला आहे; तुमची दक्षिण सीमा हीच.


एक्रोनाजवळची व पश्‍चिमेची अश्दोदाच्या बाजू-कडली सर्व नगरे व त्यांखालील खेडी.


आणि डोंगरवटीतली नगरे ही : शामीर, यत्तीर व सोखो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan