Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 कालेबाने शेशय, अहीमान व तलमय ह्या अनाकाच्या तीन वंशजांना तेथून घालवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 अनाकाचे पुत्र शेशय, अहीमान व तलमय या अनाकांच्या वंशजांना कालेबाने बाहेर घालवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:14
9 Iomraidhean Croise  

तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला;


तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.”


तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत हे तुला माहीतच आहे; ‘अनाकांच्या वंशजांशी कोण सामना करील’ असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस.


त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब येथे राहणार्‍या आणि यहूदाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अनाकी लोकांचा उच्छेद केला; यहोशवाने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.


इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.


मग हेब्रोनात राहणार्‍या कनान्यांवर यहूदा चालून गेला; त्याने शेशय, अहीमन व तलमय ह्यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते.


मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन नगर कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या तिघा मुलांना हाकून दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan