Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तिथून ती एक्रोनच्या उत्तरेकडून शिक्रोनपर्यंत गेली व बालाह पर्वतावरून यबनेलास जाऊन पोहोचली. सीमेचा शेवट भूमध्य समुद्राजवळ झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:11
15 Iomraidhean Croise  

त्याने त्याला म्हटले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्‍न करायला तू जासूद पाठवलेस ते इस्राएलात देव नाही म्हणून की काय? ह्यास्तव ज्या बिछान्यावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस; तू अवश्य मरशील.”’


त्यांनी त्याला सांगितले, “एका मनुष्याने आम्हांला वाटेत गाठून सांगितले की, ‘ज्या राजाने तुम्हांला पाठवले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, परमेश्वर म्हणतो तू एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्‍न करायला माणसे पाठवली ती इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय? तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस, तू अवश्य मरशील.”’


त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले; गथ, यन्नो व अश्दोद ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अश्दोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसवली.


तुमची पश्‍चिम सीमा महासमुद्र व त्याचा किनारा राहील; तीच तुमची पश्‍चिम सीमा होय.


तेथून ती सीमा बालापासून पश्‍चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते;


पश्‍चिमेची सरहद्द महासमुद्राचा किनारा होय. यहूदा वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे जो विभाग मिळाला त्याच्या ह्या चतु:सीमा होत.


एक्रोन, त्याची उपनगरे व खेडी,


तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते.


ह्याखेरीज यहूदाने गज्जा, अष्कलोन आणि एक्रोन ही नगरे त्यांच्या शिवारांसह घेतली.


मग इस्राएल व यहूदी उठले आणि रणशब्द करत गथ व एक्रोन ह्यांच्या वेशीपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग करीत गेले, आणि पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोन येथवर घायाळ होऊन पडले.


मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”


मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारले, “आम्ही इस्राएलाच्या देवाच्या कोशाचे काय करावे?” ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचता करावा.” तेव्हा त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचवला.


एक्रोनापासून गथपर्यंत जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती पुन्हा त्यांच्या ताब्यात आली, आणि त्यांच्या आसपासचा प्रदेशही इस्राएलाने पलिष्ट्यांच्या ताब्यातून सोडवला. त्या काळात इस्राएल व अमोरी लोक ह्यांच्यात स्वस्थता होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan