Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 15:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेथून ती सीमा बालापासून पश्‍चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तिथून ती बालाहाच्या पश्चिमेस वळसा घेऊन सेईर पर्वताकडे गेली आणि यआरीम म्हणजेच कसालोन डोंगराच्या उत्तरेस जाऊन बेथ-शेमेश इथे उतरून तिम्नाहास जाऊन पोहोचते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 15:10
12 Iomraidhean Croise  

यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला; करूबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश.


अमस्या काही केल्या ऐकेना. तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआश चढाई करून गेला; तो व यहूदाचा राजा अमस्या ह्यांचा यहूदा देशातील बेथ-शेमेश येथे सामना झाला.


आणि पलिष्टी लोक तळवट व यहूदाचा दक्षिण प्रांत ह्यांतील नगरांवर स्वारी करून बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिम्जो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यांत राहू लागले.


तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो.


काइन, गिबा व तिम्ना; अशी दहा नगरे व त्यांखालील खेडी.


इरोन, मिग्दल-एल हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे व त्यांखालील खेडी.


अईन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान अशी एकंदर नऊ नगरे त्या दोन वंशांच्या वतनातून दिली.


शमशोन तिम्ना येथे गेला; तेथे त्याने एक पलिष्टी मुलगी पाहिली.


शमशोन आपल्या आईबापासह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्यांजवळ येऊन पोहचला तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला.


मग हे पाहा, जर तो आपल्या देशाच्या वाटेने बेथ-शेमेशाकडे गेला तर समजा की त्यानेच आमच्यावर ही पीडा पाठवली होती; तसे न झाले तर त्याच्या हाताने आमच्यावर हा मार पडला नसून आम्हांला ही पीडा दैवगतीने प्राप्त झाली आहे असे आपण समजू.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan