Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 योसेफाच्या संतानाचे दोन वंश होते, ते म्हणजे मनश्शे व एफ्राईम; त्या देशात लेव्यांना त्यांनी काहीच वाटा दिला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि गुरेढोरे व कळप ह्यांच्यासाठी गायराने दिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यांना देशात त्यांनी वाटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशूंसाठी व त्यांच्या मालमत्तेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 योसेफाचे वंशज मनश्शेह व एफ्राईम अशा दोन गोत्रांमध्ये वेगळे झाले होते. लेव्यांना कोणताही वाटा मिळाला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि त्यांच्या गुरांसाठी सभोवतालची कुरणे दिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 14:4
13 Iomraidhean Croise  

योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे (विसर पाडणारा) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे.”


त्याने दुसर्‍याचे नाव एफ्राईम (फलद्रूप) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे.”


मिसर देशात ओनचा याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्या पोटी योसेफाला मनश्शे व एफ्राईम हे झाले.


ह्या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफाला सांगितले, “पाहा, आपला बाप आजारी आहे,” तेव्हा तो आपले दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांना बरोबर घेऊन त्याच्याकडे गेला.


मी मिसरात तुझ्याकडे येण्यापूर्वी, तुला जे दोन मुलगे मिसरात झाले ते माझेच आहेत, जसे रऊबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत.


त्यांच्यामागून जे मुलगे तुला होतील ते तुझे; त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल.


हिज्कीयाने सर्व इस्राएल व यहूदा ह्यांना आणि एफ्राईम व मनश्शे ह्यांनाही पत्रे लिहून कळवले की, ‘तुम्ही यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरात इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायला या.’


योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांच्यापासून जी कुळे निर्माण झाली ती ही :


येणेप्रमाणे योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांनी आपले वतन घेतले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan