Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 अडीच वंशांना मोशेने यार्देनेच्या पूर्वेस वतन दिले होतेच, पण लेवी वंशाला इतरांप्रमाणे काहीएक वतन दिले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण दोन वंशांना व अर्ध्या वंशाला मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्याबरोबर लेव्यांना वतन दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 14:3
9 Iomraidhean Croise  

तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतनासाठी देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश अर्पावा; जमिनीचा एक वाटा पवित्र म्हणून वेगळा काढून ठेवावा; त्याची लांबी पंचवीस हजार हात1 व रुंदी वीस हजार हात1 असावी; हे सारे क्षेत्र चोहोंकडून पवित्र ठेवावे.


ह्यांचा मोड परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी केला होता; आणि परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तो रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला होता. यहोशवाने पराभूत केलेले राजे


लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्ये ही त्यांचा वतनभाग होत.


त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,


हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दीबोन, बामोथ-बाल, बेथ-बाल-मोन;


मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाबरोबर रऊबेनी व गादी ह्यांना आपल्या वतनाचा वाटा मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांच्याशी ठरवल्याप्रमाणे पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांना वतन दिले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan