Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते साडेनऊ वंशांना चिठ्ठ्या टाकून वाटण्यात आले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वराने मोशेद्वारे नऊ वंशांविषयी व अर्ध्या वंशाविषयी जशी आज्ञा दिली होती, तसे चिठ्ठ्या टाकून त्यांचे वतनाचे वाटे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार साडेनऊ गोत्रांना चिठ्ठ्या टाकून वतन वाटण्यात आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 14:2
14 Iomraidhean Croise  

पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.


चिठ्ठ्या टाकल्याने झगडे मिटतात, व झुंजार भिडण्याचे राहतात.


तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतनासाठी देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश अर्पावा; जमिनीचा एक वाटा पवित्र म्हणून वेगळा काढून ठेवावा; त्याची लांबी पंचवीस हजार हात1 व रुंदी वीस हजार हात1 असावी; हे सारे क्षेत्र चोहोंकडून पवित्र ठेवावे.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांप्रमाणे वाटून घ्यावा; मोठ्या वंशाला मोठा भाग द्यावा आणि लहान वंशाला लहान भाग द्यावा; एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल; आपापल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हांला वतन मिळावे;


तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना आज्ञा केली की, “चिठ्ठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हांला मिळणार आहे, म्हणजे साडेनऊ वंशांना जो देश देण्याचे परमेश्वराने ठरवले आहे तो हाच;


“जे पुरुष हा देश तुम्हांला वतन म्हणून वाटून देणार आहेत त्यांची नावे ही : एलाजार याजक व नूनाचा मुलगा यहोशवा.


तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या;


मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.


हा देश नऊ वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतनादाखल वाटून दे.” मनश्शे, रऊबेन व गाद ह्यांना देण्यात आलेला प्रदेश


शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश


सात भागांचे वर्णन लिहून माझ्याकडे आणावे, म्हणजे मी येथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan