Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 13:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून दीबोनापर्यंतचे मेदबाचे पठार,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आर्णोन नदीच्या काठावरले अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी ते नगर, तेथून दीबोनापर्यंत मेदब्याची सर्व पठारे ही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या सीमेवर असलेले अरोएर व खोर्‍यांमधील शहरापासून दिबोनपर्यंतचा मेदबाचा सर्व पठाराचा प्रदेश,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 13:9
15 Iomraidhean Croise  

त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्‍याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले.


त्यांनी बत्तीस हजार रथ, माकाचा राजा व त्याचे लोक ह्यांना मोल देऊन बोलावले; त्यांनी येऊन मेदबासमोर छावणी दिली. अम्मोनी लोक आपापल्या नगरांतून एकत्र होऊन युद्धास आले.


खेडीपाडी व त्यांच्या शेतवाड्या ह्यांविषयी यहूदाच्या वंशातल्या कित्येकांनी किर्याथ-आर्बात व त्याच्या खेड्यांत, दिबोनात व त्याच्या खेड्यांत आणि यकब्सेलात व त्याच्या खेड्यांत


बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे.


दीबोननिवासी कन्ये, आपल्या वैभवापासून खाली उतर, रुक्ष भूमीवर बस; कारण मवाबाचा विध्वंस करणारा तुझ्यावर चाल करून आला आहे, त्याने तुझ्या दुर्गाचा विध्वंस केला आहे.


दीबोन, नबो, बेथ-दिबलाथाईम,


प्रत्येक नगरावर लुटारू येईल; कोणतेही नगर निभावणार नाही; खोरे नाश पावेल; पठार उद्ध्वस्त होईल असे परमेश्वर बोलला आहे.


आम्ही त्यांना बाण मारले आहेत; दीबोनापर्यंत हेशबोनाचा नाश झाला आहे, आणि नोफापर्यंत सर्व देश आम्ही उजाड केल्यावर मेदबापर्यंत आग पसरली आहे.”


आर्णोन खोर्‍याच्या कडेला अरोएर नगर आहे तेथून व खोर्‍यात जे नगर आहे तेथून गिलादापर्यंत आम्हांला दुर्गम असे एकही नगर राहिले नाही; आपला देव परमेश्वर ह्याने ती सर्व आपल्या स्वाधीन करून दिली;


त्या वेळी आम्ही देश काबीज केला तो येणेप्रमाणे : आर्णोन खोर्‍याच्या कडेला असलेल्या अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे हा प्रदेश मी रऊबेनी व गादी ह्यांना दिला आहे;


रऊबेनी व गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोर्‍यापर्यंतचा प्रदेश मी दिला त्या खोर्‍याच्या मध्य भागापर्यंत आणि अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्यांची सरहद्द ठरवली.


अमोर्‍यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्‍याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्‍याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर,


हेशबोनावर राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याची अम्मोन्यांच्या हद्दीपर्यंतची सारी नगरे,


त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,


मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाबरोबर रऊबेनी व गादी ह्यांना आपल्या वतनाचा वाटा मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांच्याशी ठरवल्याप्रमाणे पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांना वतन दिले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan