Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 13:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निम्रा, सुक्कोथ, साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन ह्याचे उरलेले राज्य; यार्देन व तिच्या पूर्वेस किन्नेरेथ सरोवराच्या शेवटापर्यंतचा तिला लागून असलेला प्रदेश.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आणि खोऱ्यातले बेथ-हाराम व बेथ-निम्रा व सुक्कोथ व साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा शेष भाग, यार्देन व तिच्यातीरींचा किन्नेरोथ समुद्राच्या काठापर्यंत, असे योर्देनेच्या पलीकडे पूर्वेस झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 व खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निमराह, सुक्कोथ, साफोन म्हणजे हेशबोनचा राजा सीहोनच्या राज्याचे हे उरलेले राज्य होते (यार्देन नदीच्या पूर्वबाजूपासून किन्नेरेथ समुद्रापर्यंत त्यांची सीमा होती).

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 13:27
14 Iomraidhean Croise  

पण याकोब मजल दरमजल करत सुक्कोथास गेला; तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले व आपल्या गुराढोरांसाठी खोपट्या केल्या; म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ (खोपट्या) असे पडले.


राजाने ती यार्देन खोर्‍यात सुक्कोथ व सारतान ह्यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतवली होती.


देव आपल्या पवित्रतेला अनुसरून1 म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन;


“अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन


बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही नगरे तटबंदी केली; आणि शेरडामेंढरांसाठी वाडे केले.


व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्‍याच्या उतरणीपर्यंत जावी.


नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्‍याशी उभा होता.


तसाच किन्नेरेथापासून अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र येथवर पिसगाच्या उतरणीच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.


तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात, तळवटीत आणि पश्‍चिमेकडील नाफोत-दोरात असलेल्या राजांना,


आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;


हेशबोनापासून रामाथ-मिस्पे व बटोनीम येथपर्यंतचा प्रदेश; महनाइमापासून दबीराच्या हद्दीपर्यंतचा प्रदेश.


गाद्यांचे वतन त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व खेडी ह्यांसहित हेच ठरले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan