Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 13:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्यांचा मुलुख म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा प्रदेश.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 गिलआदातील सर्व नगरे आणि राब्बाह जवळील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा देश, ही याजेरची सीमा होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 13:25
21 Iomraidhean Croise  

राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या वेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्राएल लोकांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेतच राहिला.


नंतर यवाबाने अम्मोन्यांच्या राब्बा ह्या नगराशी लढून ते राजनगर हस्तगत केले.


त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्‍याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले.


हेब्रोन्यांतला यरीया हा त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचा मुख्य होता. दाविदाच्या कारकिर्दीच्या चाळिसाव्या वर्षी त्यांचा शोध केला तेव्हा त्यांतले काही शूर वीर गिलादातल्या याजेरात सापडले.


हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.


हेशबोनाचे मळे व सिब्मेच्या द्राक्षलता ही सुकून गेली आहेत; राष्ट्रांच्या अधिपतींनी तिच्या लतांचे अंकुर खुडून टाकले आहेत. ती याजेरापर्यंत विस्तारली होती, ती रानातही पसरली होती; तिच्या फांद्या चोहोकडे पसरून समुद्रापलीकडे गेल्या होत्या.


अरोएराची नगरे लोक सोडून गेले आहेत; ती गुरांच्या कळपांची ठिकाणे झाली आहेत. ते तेथे बसतात; त्यांना घाबरवणारा कोणी नाही.


हे सिब्मेच्या द्राक्षलते, तुझ्यासाठी याजेरच्या आक्रोशाहून अधिक आक्रोश करीन; तुझ्या फांद्या समुद्रा-पलीकडे गेल्या होत्या, याजेर सरोवरापर्यंत त्या पोहचल्या होत्या; तुझ्या ग्रीष्मऋतूतील फळांवर व द्राक्षांच्या हंगामावर लुटारू पडला आहे.


अम्मोनपुत्रांचा राब्बा ह्याच्यावर तलवार येण्याचा एक रस्ता आणि यहूदात जाऊन तटबंदी केलेल्या यरुशलेमेवर तलवार येण्याचा एक रस्ता आखून काढ.


तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.


मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठवले; इस्राएल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोर्‍यांना देशाबाहेर हाकून लावले.


अटारोथ-शोफान, याजेर, यागबहा,


अम्मोनी लोकांच्या सीमेवर येशील तेव्हा त्यांना उपद्रव देऊ नकोस व त्यांच्याशी झगडा करू नकोस, अम्मोनी लोकांच्या देशाचा कोणताही भाग मी तुला वतन म्हणून देणार नाही, कारण लोटाच्या वंशजांना तो मी वतन म्हणून दिला आहे.’


(रेफाई लोकांपैकी शेष राहिला तो फक्‍त बाशानाचा राजा ओग. त्याचा पलंग लोखंडाचा होता; पाहा, तो अम्मोन्यांच्या राब्बा नगरात आहे ना? पुरुषाच्या हाताने त्याची लांबी नऊ हात व रुंदी चार हात आहे.)


गिलाद, तसेच गशूरी व माकाथी ह्यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सलकापर्यंतचा सर्व बाशान,


मग मोशेने गाद वंशालाही त्यांच्या कुळांप्रमाणे वतन दिले.


हेशबोनापासून रामाथ-मिस्पे व बटोनीम येथपर्यंतचा प्रदेश; महनाइमापासून दबीराच्या हद्दीपर्यंतचा प्रदेश.


हेशबोन व त्याचे गायरान आणि याजेर व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली.


गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजांपाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनार्‍यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यांवर बसून राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan