Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 13:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या काठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आर्णोन खोर्‍यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्‍यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 13:16
18 Iomraidhean Croise  

त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्‍याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले.


त्यांनी बत्तीस हजार रथ, माकाचा राजा व त्याचे लोक ह्यांना मोल देऊन बोलावले; त्यांनी येऊन मेदबासमोर छावणी दिली. अम्मोनी लोक आपापल्या नगरांतून एकत्र होऊन युद्धास आले.


हेशबोन व एलाले ही ओरडत आहेत, याहसापर्यंत त्यांचा आक्रोश ऐकू जात आहे; ह्यास्तव मवाबाचे हत्यारबंद लोक आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव घाबरा झाला आहे;


हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे नगर होते; त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून आर्णोनेपर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता.


त्या वेळी आम्ही देश काबीज केला तो येणेप्रमाणे : आर्णोन खोर्‍याच्या कडेला असलेल्या अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे हा प्रदेश मी रऊबेनी व गादी ह्यांना दिला आहे;


अमोर्‍यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्‍याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्‍याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर,


मोशेने रऊबेनी वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे वतन दिले.


हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दीबोन, बामोथ-बाल, बेथ-बाल-मोन;


म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून दीबोनापर्यंतचे मेदबाचे पठार,


अडीच वंशांना मोशेने यार्देनेच्या पूर्वेस वतन दिले होतेच, पण लेवी वंशाला इतरांप्रमाणे काहीएक वतन दिले नव्हते.


लेव्यांना तर तुमच्यामध्ये वतन नाही; परमेश्वराने त्यांना दिलेली याजकवृत्ती हीच त्यांचे वतन होय; गाद, रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना यार्देनेच्या पूर्वेस वतन मिळून चुकले आहे; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांना ते दिले आहे.”


हेशबोन व त्याची उपनगरे, अरोएर व त्याची उपनगरे आणि आर्णोनतीरीची सर्व नगरे ह्यांत आज तीनशे वर्षे इस्राएल वस्ती करून आहे, तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत?


अरोएर, सिफमोथ, एष्टमो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan