Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तरी इस्राएल लोकांनी गशूरी व माकाथी ह्यांना देशाबाहेर काढले नाही; गशूरी व माकाथी आजवर इस्राएलात वस्ती करून आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी व माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु इस्राएली लोकांनी गशूरी व माकाथी लोकांना घालवून दिले नव्हते, म्हणून आज देखील ते लोक इस्राएली लोकात राहत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 13:13
13 Iomraidhean Croise  

इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.


कर्मेली नाबालाची स्त्री अबीगईल हिच्यापासून त्याला किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र; गशूराचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला;


पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील, आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हांला त्रास देतील.


मनश्शेचा मुलगा याईर ह्याने गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंत अर्गोबाचा सर्व प्रदेश हस्तगत केला आणि बाशानाला आपले नाव म्हणजे हव्वोथ-याईर असे ठेवले, तेच आजवर चालत आहे.)


आणि हर्मोन पर्वत, सलका, गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गिलादावर त्याची सत्ता होती.


गिलाद, तसेच गशूरी व माकाथी ह्यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सलकापर्यंतचा सर्व बाशान,


म्हणजे रेफाईतला एकटाच वाचलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग ह्याचे सारे राज्य; ह्यांचा मोशेने मोड करून त्यांना हाकून लावले होते.


लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्ये ही त्यांचा वतनभाग होत.


मग दावीद व त्याचे लोक ह्यांनी गशूरी, गिरजी व अमालेकी ह्यांच्यावर स्वारी केली; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश लागतो त्यात ही राष्ट्रे प्राचीन काळापासून वसली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan