Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, अराब समुद्राच्या पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 12:3
15 Iomraidhean Croise  

हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्‍यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र.


आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्वकाही ह्यांचा त्याने नाश केला;


आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हदादाने आपल्या सेनांच्या सरदारांना इस्राएली नगरांवर स्वारी करायला पाठवले; त्यांनी ईयोन, दान, आबेल-बेथ-माका, सगळा किन्नेरोथ व नफतालीचा सर्व प्रदेश जिंकला.


म्हणून पाहा, मी मवाबाचा स्कंधप्रदेश उघडा करीन, त्याची नगरे, त्याच्या सीमेतली नगरे, देशाला भूषण अशी बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही नगरे


आणि बामोथाहून कूच करून रानापुढील (येशीमोनापुढील) पिसगाच्या माथ्याजवळ असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोर्‍याकडे ते जाऊन पोहचले.


व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्‍याच्या उतरणीपर्यंत जावी.


नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्‍याशी उभा होता.


ह्यानंतर येशू गालीलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला.


तसाच किन्नेरेथापासून अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र येथवर पिसगाच्या उतरणीच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.


आणि पिसगाच्या उतरणीखाली अराबाच्या समुद्रा-पर्यंत यार्देनेच्या पूर्वेकडील सर्व अराबा.


तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात, तळवटीत आणि पश्‍चिमेकडील नाफोत-दोरात असलेल्या राजांना,


बेथ-पौर, पिसगाच्या उतरणी, बेथ-यशिमोथ,


त्यांच्या दक्षिण सीमेस क्षार समुद्राच्या दक्षिणेकडील खाडीपासून आरंभ झाला;


त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनार्‍यापर्यंत ठरली आहे. आणि उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन,


तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्‍याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan