Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ-माईमापर्यत आणि पूर्वेस मिस्पे खोर्‍यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की, त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेहने त्यांना इस्राएली लोकांच्या हाती दिले व त्यांनी शत्रूंचा सीदोन महानगरीपर्यंत व मिसरेफोत-मयिम या ठिकाणापर्यंत आणि पूर्वेस मिस्पेह खोर्‍यापर्यंत पाठलाग केला; अशा रीतीने या लढाईत शत्रूंचा एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 11:8
13 Iomraidhean Croise  

कनान ह्याला सीदोन हा पहिला मुलगा आणि हेथ,


जबुलून सागरतीरी वस्ती करील; तो जहाजांचे बंदरच होऊन राहील; त्याची सरहद्द सीदोनापर्यंत जाईल.


मग ते गिलाद व तहतीम होदशी ह्या प्रदेशांत गेले; पुढे दान्यान येथे गेले; तेथून वळसा घेऊन ते सीदोनास गेले.


हे सीदोना, फजीत हो; समुद्र, समुद्रदुर्ग म्हणत आहे : “मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणांना वाढवले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत.”


त्याच्या सीमेवरल्या हमाथाकडे आणि सोर व सीदोन ह्यांच्याकडेही ती आहे; कारण ती फार शहाणी आहेत.


आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस.


तर आता हे पक्के लक्षात ठेव की, भस्म करणार्‍या अग्नीसारखा तुझ्यापुढे जो पलीकडे जात आहे तो तुझा देव परमेश्वर आहे; तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चीत करील, आणि परमेश्वराने तुला सांगितल्याप्रमाणे तू त्यांना घालवून देऊन त्यांचा त्वरित नाश करशील.


यहोशवा आणि इस्राएल लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले, पण त्यांच्यातले काही लोक वाचून तटबंदीच्या नगरात गेले.


आणि पूर्वेकडले व पश्‍चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी ह्यांना बोलावणे पाठवले.


तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम सरोवराजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.


लबानोनापासून मिस्रपोथ-माईमापर्यंतच्या डोंगराळ प्रदेशातील सीदोनाच्या रहिवाशांना मी इस्राएल लोकांपुढून घालवून देईन; तू मात्र माझ्या आज्ञेप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्यांचा देश इस्राएल लोकांना वाटून दे.


तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सीदोन येथपर्यंत जाते;


परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan