Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्राएलाच्या हाती देईन; त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी या वेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु याहवेह यहोशुआला म्हणाले, “तू त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या यावेळेस मी त्यांना मृत झालेले इस्राएलच्या हाती देईन. त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ जाळून टाक.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 11:6
24 Iomraidhean Croise  

दाविदाने एक हजार सातशे स्वार आणि वीस हजार पायदळ त्याच्यापासून हस्तगत केले; रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडल्या, मात्र त्यांतून शंभर घोडे राखून ठेवले.


तो म्हणाला, “भिऊ नकोस; त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.”


उद्या त्यांच्याशी सामना करण्यास जा; पाहा, ते सीसघाट चढून येत आहेत, यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यांना गाठाल.


“शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.”


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.


जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.


तुम्ही म्हणाला, “नाही! आम्ही घोड्यावर बसून पळू,” म्हणून तुम्हांला पळावे लागेल; तुम्ही म्हणाला, “आम्ही चपळ घोड्यांवर बसू,” म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील.


जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!


तेव्हा इस्राएलच्या नगरांतले रहिवासी बाहेर निघून ढाली व कवचे, धनुष्ये व बाण, गदा व भाले इत्यादी शस्त्रांना आग लावून जाळतील; त्यांचे त्यांना सात वर्षे सरपण होईल;


अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते.


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.


जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा संहार कर; त्यांची कीव करू नकोस; त्यांच्या देवांची सेवा करू नकोस, तसे करणे तुला पाशवत होईल.


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”


ह्या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला.


तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम सरोवराजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.


परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.


मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे.”


आणि अहरोनाचा नातू, एलाजाराचा मुलगा फिनहास हा त्या काळी त्या कोशाच्या सेवेस असे.) लोकांनी परमेश्वराला विचारले, “आमचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्याशी लढायला पुन्हा एकदा जावे काय? किंवा लढण्याचे सोडून द्यावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “चाल करून जा; कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन.”


त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, “ऊठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे.


त्यांनी त्या आलेल्या जासुदांना सांगितले, “तुम्ही याबेश-गिलादाच्या लोकांना जाऊन सांगा की, ‘उद्या ऊन होण्याच्या सुमारास तुम्हांला कुमक येऊन पोहचेल.” त्या जासुदांनी जाऊन याबेशच्या लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांना फार आनंद झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan