Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात, तळवटीत आणि पश्‍चिमेकडील नाफोत-दोरात असलेल्या राजांना,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 व उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांचे सर्व राजे; किन्नेरेथाच्या दक्षिणेकडील अराबात असलेले राजे; तळवटीत असलेले राजे, पश्चिमेकडील नाफथ दोराच्या प्रदेशातील राजे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 11:2
14 Iomraidhean Croise  

आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हदादाने आपल्या सेनांच्या सरदारांना इस्राएली नगरांवर स्वारी करायला पाठवले; त्यांनी ईयोन, दान, आबेल-बेथ-माका, सगळा किन्नेरोथ व नफतालीचा सर्व प्रदेश जिंकला.


दोरच्या सर्व पठारात बेन-अबीनादाब (शलमोनाची कन्या टाफाथ ही त्याची स्त्री होती);


व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्‍याच्या उतरणीपर्यंत जावी.


त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली;


नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्‍याशी उभा होता.


ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यांतील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडवला; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला.


हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊ नकोस; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.”


अशा प्रकारे यहोशवाने डोंगरी मुलुख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, अराबा इस्राएलाचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट,


त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब येथे राहणार्‍या आणि यहूदाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अनाकी लोकांचा उच्छेद केला; यहोशवाने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.


नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल1 येथील गोयीमाचा2 राजा,


आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;


खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निम्रा, सुक्कोथ, साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन ह्याचे उरलेले राज्य; यार्देन व तिच्या पूर्वेस किन्नेरेथ सरोवराच्या शेवटापर्यंतचा तिला लागून असलेला प्रदेश.


इस्साखार व आशेर ह्यांच्या प्रांतांत मनश्शेचे गाव होते ते हे बेथ-शान व त्याची उपनगरे, इब्लाम व त्याची उपनगरे, दोर येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, एन-दोरची लोकवस्ती व त्याची उपनगरे, तानख येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे, मगिद्दो येथील लोकवस्ती व त्याची उपनगरे हे तीन परगणे.


मनश्शेने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ह्या नगरांतील व त्यांच्या उपनगरांतील रहिवाशांना घालवून दिले नाही, कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा हट्ट धरला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan