Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 यहोशवाने कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलुख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत ह्यात त्यांचा धुव्वा उडवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 यहोशवाने तलवारीने हल्ला करून कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 कादेश-बरनेआपासून गाझापर्यंत आणि गोशेनपासून गिबोनापर्यंतचे प्रदेश यहोशुआने हस्तगत केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:41
19 Iomraidhean Croise  

कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.


गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनाला दर्शन दिले; देवाने त्याला म्हटले, “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.”


अष्कलोन हे पाहून घाबरेल; गज्जाही हे पाहून वेणा देईल, व एक्रोनही असेच करील, कारण त्याची आशा नष्ट होऊन ते लज्जित होईल; गज्जात राजा नाही असे होईल, अष्कलोनात वस्ती व्हायची नाही.


ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्राएलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकिकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली.


तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले.


तेथून तुमची सरहद्द अक्रब्बीम चढावाच्या दक्षिणेस पोचून तेथून वळून त्सीनापर्यंत असावी, आणि ती तशीच कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जावी, आणि हसर-अद्दारापर्यंत जाऊन असमोनास पोचावी;


इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.”


मग आपण होरेबाहून कूच करून आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार जे मोठे व भयानक रान अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशाकडे जाताना तुम्हांला लागले, ते सर्व ओलांडून कादेश-बर्ण्यापर्यंत पोहचलो.


तसेच अव्वी लोक गज्जा नगरापर्यंत खेड्यापाड्यांत वस्ती करून होते; कफतोराहून आलेले कफतोरी ह्यांनी त्यांचा संहार करून त्यांच्या जागी वस्ती केली.)


जेव्हा परमेश्वराने कादेश-बर्ण्याहून तुम्हांला रवाना करून सांगितले की, ‘जा, व जो देश मी तुम्हांला दिला आहे तो ताब्यात घ्या,’ तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही.


परमेश्वराने अमोर्‍यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्‍यावर स्थिर हो.”


तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते; ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते.


अशा प्रकारे यहोशवाने डोंगरी मुलुख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, अराबा इस्राएलाचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट,


इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.


गोशेन, होलोन व गिलो, अशी अकरा नगरे व त्यांखालील खेडी.


मग शमशोन गज्जा येथे गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली, आणि तो तिच्याकडे गेला.


पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले.


पलिष्ट्यांनी परमेश्वरास दोषार्पण म्हणून ज्या ग्रंथींच्या सुवर्णप्रतिमा पाठवल्या त्या अश्दोदासाठी एक, गज्जासाठी एक, अष्कलोनासाठी एक, गथासाठी एक व एक्रोनासाठी एक अशा होत्या;


Lean sinn:

Sanasan


Sanasan