Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यांतील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडवला; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 अशा रीतीने यहोशुआने सर्व देश, म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव प्रांत, पश्चिमी तळवट, डोंगराची उतरण, तेथील राजांसह हस्तगत केला. एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. याहवेह इस्राएलच्या परमेश्वरांनी आज्ञापिल्याप्रमाणे प्रत्येक जीवधारी प्राण्यांचा नाश केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:40
26 Iomraidhean Croise  

राजा होताच त्याने यराबामाच्या सर्व घराण्याचा संहार केला; त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांचा नाश केला. त्यांतील एकही प्राणी जिवंत ठेवला नाही. परमेश्वराने आपला सेवक शिलोकर अहीया ह्याच्या द्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे सर्व झाले.


त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला; तू त्यांच्यादेखत देशातले कनानी रहिवासी ह्यांना पादाक्रांत केले; त्यांचे राजे व देशाचे लोक ह्यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यांना तू त्यांच्या हाती दिलेस.


देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील.


तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.


मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवताना सांगितले की, “येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा;


तर आता येथून कूच करा, आणि अमोर्‍यांच्या पहाडी प्रदेशात आणि त्यांच्या आसपासच्या सर्व प्रदेशात चला, म्हणजे अराबात, डोंगरवटीत, तळवटीत, नेगेबात व समुद्रतीरी असलेल्या कनान्यांच्या देशात व लबानोनापर्यंत आणि फरात महानदीपर्यंत जा.


त्या वेळी आपण त्याची सर्व नगरे घेतली आणि प्रत्येक नगराचा, त्यांतील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला; आपण त्यांतला कोणीही शिल्लक ठेवला नाही;


तो त्यांचे राजे तुझ्या हाती देईल आणि त्यांचे नाव तू पृथ्वीवरून1 नष्ट करशील. त्यांतला कोणीही शेवटपर्यंत तुझ्याशी सामना करणार नाही, तूच त्यांचा संहार करशील.


त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील सगळ्या प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला.


त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यांतले सर्व प्राणी ह्यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या सर्व प्राण्यांचा समूळ नाश केला.


त्याने ते, तेथला राजा व त्याची सर्व उपनगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला आणि तेथील सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत राहू दिले नाही; हेब्रोनाचे तसेच लिब्ना व त्याचा राजा ह्यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा ह्यांचेही केले.


अशा प्रकारे यहोशवाने डोंगरी मुलुख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, अराबा इस्राएलाचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट,


तेथील डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.)


बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या कुळां-प्रमाणे ही नगरे मिळाली : यरीहो, बेथ-होग्ला, एमेक-केसीस,


हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे, मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.


यरीहो आणि त्याचा राजा ह्यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा ह्यांचे कर; मात्र तेथील हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपल्यासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव.”


परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरातली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली.


त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हांला द्यावा आणि तुमच्यासमोर देशातील सर्व रहिवाशांचा संहार करावा असे तुझा देव परमेश्वर ह्याने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जिवाची भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan