Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तेव्हा इस्राएली राष्ट्राने आपल्या शत्रूंचा सूड घेईपर्यंत सूर्य स्थिर उभा राहिला, आणि चंद्र स्तब्ध झाला. जसे याशारच्या ग्रंथात लिहिलेले आहे. सूर्य संपूर्ण दिवसभर आकाशात मध्यभागी स्थिर राहिला आणि त्याने अस्त होण्यास विलंब केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:13
29 Iomraidhean Croise  

आणि हे धनुष्य नामक गीत यहूद्यांना शिकवण्याची आज्ञा केली; पाहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे :


हिज्कीयाने म्हटले, “छाया दहा अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे; तर छाया दहा अंश मागे यावी.”


फर्मानाची नक्कल प्रत्येक प्रांतात प्रसिद्ध व्हावी आणि त्या दिवशी आपल्या शत्रूंचे उसने फेडण्यास सर्व यहूद्यांनी तयार व्हावे असे सर्व लोकांना जाहीर करण्यात आले.


त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही; तो तार्‍यांना मोहोरबंद करतो,


अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्‍यांनो, त्याचे स्तवन करा.


तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे.


चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.


पाहा, आहाजाच्या शंकुयंत्राच्या पायर्‍यांवर सूर्याबरोबर छाया दहा पायर्‍या उतरली आहे, तिला परत दहा पायर्‍या वर आणतो.” तेव्हा सूर्याबरोबर छाया दहा पायर्‍या उतरली होती ती दहा पायर्‍या मागे सरकली.


त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात.


परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.


सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशण्याचे थांबतात.


तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने, तुझ्या झळकणार्‍या भाल्याच्या चकाकीने, सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्‍चल झाले आहेत.


ह्यामुळे ‘परमेश्वराचे संग्राम’ नावाच्या ग्रंथात येणेप्रमाणे लिहिले आहे : “सुफातला वाहेब, व आर्णोनेची खोरी


“इस्राएल लोकांच्या वतीने मिद्यान्यांचा सूड घे; त्यानंतर तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.”


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.


तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?


परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल;


ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.


असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.


नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.


ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”


त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला;


चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्‍यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.


तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला : “हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन.”


“इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan