Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 परमेश्वराने अमोर्‍यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्‍यावर स्थिर हो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ज्या दिवशी याहवेहने अमोरी लोकांना इस्राएली लोकांच्या हाती दिले, तेव्हा इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआ याहवेहना म्हणाला: “सूर्या, गिबोनावर स्थिर उभा हो, आणि हे चंद्रा, तू अय्यालोनच्या खोर्‍यावर स्तब्ध राहा”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:12
29 Iomraidhean Croise  

मग नेराचा पुत्र अबनेर आणि शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्यांचे सेवक महनाइमाहून गिबोन येथे गेले.


हिज्कीयाने म्हटले, “छाया दहा अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे; तर छाया दहा अंश मागे यावी.”


यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया दहा अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली.


यशया म्हणाला, “परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच ह्याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे : शंकुयंत्रावरील छाया दहा अंश पुढे जावी की मागे यावी?”


बरीया व शमा हे अयालोनकरांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष होते व त्यांनी गथकरांना पळवून लावले;


सोरा, अयालोन व हेब्रोन ही यहूदातील व बन्यामिनातील तटबंदीची नगरे त्याने बांधली.


त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही; तो तार्‍यांना मोहोरबंद करतो,


अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्‍यांनो, त्याचे स्तवन करा.


तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे.


दिवस तुझा आहे, रात्रही तुझी आहे; चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.


परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपली विलक्षण कृती सिद्धीस नेण्यास परासीम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोर्‍यातल्याप्रमाणे क्षुब्ध होईल.


पाहा, आहाजाच्या शंकुयंत्राच्या पायर्‍यांवर सूर्याबरोबर छाया दहा पायर्‍या उतरली आहे, तिला परत दहा पायर्‍या वर आणतो.” तेव्हा सूर्याबरोबर छाया दहा पायर्‍या उतरली होती ती दहा पायर्‍या मागे सरकली.


तुझ्या सूर्याचा ह्यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल; तुझे शोकाचे दिवस संपले आहेत,


नंतर असे झाले की त्याच वर्षी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभी चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर ह्याने परमेश्वराच्या मंदिरात याजकांसमोर व सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की,


मी तर त्यांच्यापुढून अमोरी लोकांचा संहार केला; त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते; मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासवले.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन.


परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याच्यापुढे स्तब्ध राहो.


तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने, तुझ्या झळकणार्‍या भाल्याच्या चकाकीने, सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्‍चल झाले आहेत.


सर्व मानवहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे.


म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले,


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.


शालब्बीन, अयालोन व इथला;


अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही चार नगरे त्यांनी दिली.


एलोन जबुलूनी मृत्यू पावला आणि त्याला जबुलूनातील अयालोन येथे मूठमाती देण्यात आली.


आकाशातून तारे लढले; त्यांनी आपापल्या कक्षेतून सीसराशी लढाई केली.


मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली, आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली; तेव्हा सर्व लोकांना परमेश्वराची व शमुवेलाची दहशत बसली.


त्या दिवशी मिखमाशापासून अयालोनापर्यंत ते पलिष्ट्यांना चोपत गेले, पण ते अगदी व्याकूळ झाले होते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan