Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मग याहवेहने इस्राएली समोर शत्रू सैन्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि यहोशुआ व इस्राएलांच्या सैन्याने गिबोनाजवळ पूर्णपणे त्यांचा पराभव केला. इस्राएली लोकांनी वर बेथ-होरोनकडे जाणार्‍या वाटेपर्यंत त्यांचा पाठलाग केला व अजेकाह व मक्केदापर्यंत त्यांना मारत आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 10:10
29 Iomraidhean Croise  

त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली; विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली.


शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोन,


तेव्हा परमेश्वराने आसा व यहूदी ह्यांच्यापुढे कूशी लोकांना असा मार दिला की ते पळून गेले.


पण जे सैन्य लढाईस आपल्याबरोबर न नेता अमस्याने परत लावून दिले होते त्या सैन्याने शोमरोनापासून बेथ-होरोनापर्यंत यहूदाच्या नगरांवर हल्ला केला; त्यांनी त्यांतल्या तीन हजारांना ठार करून पुष्कळ लूट नेली.


त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली; त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली.


ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती.


सर्वसमर्थाने राजांची दाणादाण केली, तेव्हा सलमोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.


त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले.


परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपली विलक्षण कृती सिद्धीस नेण्यास परासीम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोर्‍यातल्याप्रमाणे क्षुब्ध होईल.


तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.


त्या वेळेस बाबेलचे सैन्य यरुशलेमेवर आणि यहूदाची उरलेली नगरे म्हणजे लाखीश व अजेका ह्यांवर चढाई करून युद्ध करीत होते; यहूदाची तटबंदी केलेली नगरे एवढीच उरली होती.


तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल; पूर्वी युद्धाच्या दिवशी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील.


तरी तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हाती देईल आणि त्यांचा समूळ नाश होईपर्यंत त्यांना गोंधळात टाकील.


ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.


त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला; त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही; त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.


यहोशवा रातोरात गिलगालाहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला.


परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ-माईमापर्यत आणि पूर्वेस मिस्पे खोर्‍यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की, त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.


मक्केदाचा राजा, बेथेलाचा राजा,


यर्मूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका;


गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा, अशी सोळा नगरे व त्यांखालील खेडी.


पश्‍चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ-होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्रकिनार्‍यास मिळते.


एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे ही ठरली : त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ-अद्दार येथून वरल्या बेथ-होरोनास जाते.


किबसाईम व त्याचे गायरान आणि बेथ-होरोन व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे त्यांना दिली.


परमेश्वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्यांचा बाराकासमोर तलवारीने धुव्वा उडवला; तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.


इकडे बाराकाने हरोशेथ-गोयीमापर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीने पडली; त्यातला एकही वाचला नाही.


आकाशातून तारे लढले; त्यांनी आपापल्या कक्षेतून सीसराशी लढाई केली.


दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि तिसरी टोळी सबोईम खोर्‍याकडील प्रांताच्या वाटेने रानाकडे गेली.


पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहूदा देशातील सोखो ह्या ठिकाणी जमून सोखो व अजेका ह्यांच्या दरम्यान अफस-दम्मीम येथे छावणी दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan