Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 “छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की, ‘आपली भोजनसामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसांच्या आत तुम्हांला ही यार्देन ओलांडायची आहे.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 “छावणीतून फिरून लोकांस अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “छावणीमधून जा आणि लोकांना सांगा, ‘तुमची अन्नसामुग्री तयार ठेवा. आतापासून तीन दिवसात तुम्ही येथून यार्देन नदी पार करून जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहेत, त्याचा ताबा घ्याल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 1:11
9 Iomraidhean Croise  

“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्‍या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.


तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्‍या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.


तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्‍या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू.


जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात; तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल.


त्या वेळी मी तुम्हांला आज्ञा केली की, ‘तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला हा देश वतन म्हणून दिला आहे, तेव्हा तुम्ही सर्व योद्धे सशस्त्र होऊन आपल्या इस्राएल भाऊबंदांच्या आघाडीस पैलतीरी जा;


हे इस्राएला, श्रवण कर; तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यार्देन उतरून जाणार आहेस; त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबी आहेत;


मग यहोशवाने लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली की,


“माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ह्यांना, अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.


तीन दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan